'सावळ्याची जणू सावली'मध्ये वधूच्या गेटअपमध्ये घोड्यावरून सावलीची मंडपात एन्ट्री, प्राप्ती रेडकर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:11 IST2025-06-13T19:10:38+5:302025-06-13T19:11:22+5:30

Savalyanchi Janu Savali Serial : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला.

Wedding shoot in 'Savalyanchi Janu Savali' Serial, Savali enters the pavilion on horseback in the bride's getup, Prati Redkar said... | 'सावळ्याची जणू सावली'मध्ये वधूच्या गेटअपमध्ये घोड्यावरून सावलीची मंडपात एन्ट्री, प्राप्ती रेडकर म्हणाली...

'सावळ्याची जणू सावली'मध्ये वधूच्या गेटअपमध्ये घोड्यावरून सावलीची मंडपात एन्ट्री, प्राप्ती रेडकर म्हणाली...

'सावळ्याची जणू सावली' (Savalyanchi Janu Savali Serial) मालिकेला कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सावली आणि सारंगची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अलिकडेच ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला. आता मालिकेतील लग्न म्हटल्यावर त्यात काहीतरी ट्विस्ट असणारच. या लग्नाच्या भागात सावलीने घोड्यावरून लग्न मंडपात एन्ट्री केली. तिच्या एन्ट्रीवर तुमचा प्रतिसाद पाहून कलाकाराची मेहनत सफल होताना दिसते. 

सावलीची भूमिका साकारत असेलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकरने घोडेस्वारी सीनचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, "जेव्हा मला कळलेलं की सेटवर घोडा येणार आहे. तेव्हा पासून मी उत्साही होते आणि त्यात मला नऊवारी साडी नेसून साज- शृंगार करून घोडेस्वारीचा सीन पूर्ण करायचा होता. हे ऐकल्यावर मी थोडी नर्व्हस होते, कारण पहिल्यांदाच आयुष्यात मी हे करणार होते. 

ती पुढे म्हणाली की, माझ्या आई- बाबांनी माझ्या आत्मविश्वास वाढवला. मला सेटवरच याची ट्रेनिंग दिली गेली. मला दिग्दर्शक सर म्हणले की, तुला बॉडी डब्बलची गरज आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितले हे मी स्वतः करणार. नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि सावळा मेकअप उन्हात सांभाळून घोडेस्वारी करण आव्हानात्मक होते. पण छानपणे आमचे  सीन्स पार पडले. जेव्हा सेटवर घोड्याची  एन्ट्री झाली तेव्हा मला कळले की तो घोडा नाही तर घोडी आहे आणि तिचे नाव रज्जो आहे. मी सीन्समध्ये तिच्याशी गप्पा मारत होते. म्हणजे मी बोलत होते आणि ती ऐकत होती. मी रज्जोच्या प्रेमात पडली, सीनमध्ये जेव्हा ऊन लागत होते तेव्हा तिला सावली मिळत आहे याची मी काळजी घेत होती. कमी वेळात घट्ट नातं निर्माण झालं होतं आमच्यात. कलाकार म्हणून अनेक वेगळ्या गोष्टी मला करण्याचा अनुभव मिळतो.

Web Title: Wedding shoot in 'Savalyanchi Janu Savali' Serial, Savali enters the pavilion on horseback in the bride's getup, Prati Redkar said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.