लवकरच भेटू...! प्राईमची सोशल मीडिया पोस्ट; 'पंचायत 3' बद्दल मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:01 PM2024-04-05T12:01:10+5:302024-04-05T12:06:33+5:30

पंचायत सीरिजच्या पहिल्या सीझनला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.

webseries Panchaya 3 will soon release now prime celebrating 4 years of panchayat | लवकरच भेटू...! प्राईमची सोशल मीडिया पोस्ट; 'पंचायत 3' बद्दल मोठी अपडेट समोर

लवकरच भेटू...! प्राईमची सोशल मीडिया पोस्ट; 'पंचायत 3' बद्दल मोठी अपडेट समोर

ओटीटीवरील सर्वांची लाडकी वेबसीरिज 'पंचायत' च्या सीझन 3 ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राईमने त्यांचे वर्षभरातील 70 प्रोजेक्ट्स जाहीर केले. यामध्ये 'पंचायत'चाही समावेश आहे. सीझन 3 चं शूटिंग पूर्ण होऊन आता बरेच दिवस झालेत. मात्र मेकर्सने अद्याप रिलीज डेट जाहीर केलेली नाही. नुकतेच पंचायतच्या सिझन 1 ला चार वर्ष झाले आहेत. यानिमित्त अॅमेझॉनने पोस्ट शेअर केली असून सिझन 3 च्या रिलीज डेटचीही हिंट दिली आहे.

'पंचायत 3' (Panchayat 3) ची वाट बघत बघत आता 'पंचायत' सिझन १ ला चार वर्ष झाली आहेत. या सीरिजने प्रेक्षकांना खूप हसवलं, रडवलं आहे. प्रेक्षक फुलेरा गावाच्या प्रेमातच पडलेत. सचिवजी, प्रधानजी, विनोद, रिंकी असे अनेक पात्र गाजले आहेत. आता तिसऱ्या भागात अभिषेक त्रिपाठी सचिव नसणार अशीही चर्चा आहे. म्हणजेच 'फुलेरा' गावाला नवीन सचिव मिळणार आहे. प्राईमने पोस्ट शेअर करत लिहिले, 'बघ विनोद कसं पोस्ट टाकून ४ वर्ष झाल्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे.' पंचायत कुटुंबाचे 4 वर्ष. कमेंटमध्ये hi लिहा, लवकरच भेटुया. '

प्राईमच्या या पोस्टमधून पुन्हा रिलीज डेट तर समोर आलेली नाही. पण आता सीझन 3 लवकरच येतोय हे स्पष्ट झालं आहे. चाहत्यांनी धडाधड कमेंट केल्या आहेत आणि रिलीज डेट सांगा म्हणत ते देखील आतुर झाले आहेत. आता मात्र चाहत्यांची प्रतिक्षा संपत चालली आहे. रिलीज डेट सांगत नसल्याने काही चाहते निराशही झाले आहेत. 'पंचायत 3' साठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

'पंचायत' मध्ये आतापर्यंत जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत.

Web Title: webseries Panchaya 3 will soon release now prime celebrating 4 years of panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.