सर्वांना घाबरवणाऱ्या 'तुंबाड' फेम दिग्दर्शकाची नवीन वेबसिरीज, बहिणीनं केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:26 PM2024-03-21T13:26:41+5:302024-03-21T13:28:20+5:30

'तुंबाड'नंतर दिग्दर्शक राही अनिल बर्वेंच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा, काय असणार विषय?

Tumbbad movie director rahi anil barve new webseries gulkand tales on prime video | सर्वांना घाबरवणाऱ्या 'तुंबाड' फेम दिग्दर्शकाची नवीन वेबसिरीज, बहिणीनं केली घोषणा

सर्वांना घाबरवणाऱ्या 'तुंबाड' फेम दिग्दर्शकाची नवीन वेबसिरीज, बहिणीनं केली घोषणा

'तुंबाड' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. २०१८ साली आलेला 'तुंबाड'ने सर्वांना घाबरवून सोडलं. आजही भयपट म्हटलं की 'तुंबाड' आठवतो. मराठमोळा दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी 'तुंबाड'चं दिग्दर्शन केलं. 'तुंबाड' नंतर राही अनिल बर्वेच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आता प्रतिक्षा संपली आहे. 'तुंबाड' नंतर राहीच्या आगामी सिनेमाबद्दल माहिती त्याची बहिण अन् मराठमोळी नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरने दिली आहे.

'तुंबाड'नंतर राही प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर 'गुलकंद टेल्स' ही नवी वेबसिरीज आणत आहेत. १९ मार्चला मुंबईत या सिरीजची घोषणा करण्यात आली. याविषयी फुलवा खामकर लिहीतात, "अखेर गुलकंद टेल्स लवकरच भेटीला. माझा भाऊ राही अनिल बर्वे लेखन - दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना पुन्हा एकदा. मला खुप आनंद होत आहे गुलकंद टेल्सची घोषणा करताना.."

फुलवा खामकर पुढे लिहीतात, "तुंबाडनंतर प्रत्येक जण राहीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत होतं. गुलकंदच्या भूमीवर आधारीत एक वैशिष्ट्यपूर्ण कहाणी तुम्हाला गुलकंद टेल्स मधून बघायला मिळेल. राज आणि डीके राहीवर विश्वास ठेवला त्यासाठी धन्यवाद." अशाप्रकारे 'तुंबाड'नंतर राहीचा नवीन प्रोजेक्ट अन् ते सुद्धा वेबसिरीज बघायला सगळे उत्सुक असतील यात शंका नाही. 'फॅमिली फॅन' राज आणि डीके यावेळी निर्माते म्हणून राहीला साथ देत असल्याची शक्यता आहे.

Web Title: Tumbbad movie director rahi anil barve new webseries gulkand tales on prime video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.