'मिर्झापूर ४'मध्ये संपणार कालीन भैया आणि गुड्डू भैय्याचा खेळ! बीना भाभीने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:14 PM2024-04-09T15:14:31+5:302024-04-09T15:15:15+5:30

Mirzapur Web Series : मिर्झापूर ३ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकजण त्याच्या रिलीजची वाट पाहत आहे. दरम्यान, या मालिकेच्या चौथ्या सीझनबाबत रसिका दुग्गलने हिंट दिली आहे.

The game of Kaleen Bhaiya and Guddu Bhaiya will end in 'Mirzapur 4'! Bina Bhabhi gave the hint | 'मिर्झापूर ४'मध्ये संपणार कालीन भैया आणि गुड्डू भैय्याचा खेळ! बीना भाभीने दिली हिंट

'मिर्झापूर ४'मध्ये संपणार कालीन भैया आणि गुड्डू भैय्याचा खेळ! बीना भाभीने दिली हिंट

मिर्झापूर (Mirzapur) या लोकप्रिय वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. अलीकडेच अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या कार्यक्रमात कालिन भैयाची झलकही पाहायला मिळाली. सध्या त्याची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र याआधीच 'मिर्झापूर ४' (Mirzapur 4) बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिर्झापूरमधील कालिन भैय्याच्या पत्नी बीना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने या मालिकेच्या चौथ्या सीझनबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की मिर्झापूर ४ हा शेवटचा सीझन असू शकतो, ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

'मिर्झापूर ४' असेल मालिकेचा शेवटचा सीझन!
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रसिका दुग्गलने म्हटले की, मिर्झापूर ४ हा या मालिकेच्या कथेचा क्लायमॅक्स सीझन असू शकतो, ज्यामध्ये कालिन भैया आणि गुड्डू भैय्याचा खेळ संपू शकतो. वास्तविक, गुड्डू भैया म्हणजेच अली फजल मिर्झापूर ३ वर राज्य करणार आहे. त्याचवेळी अखंडानंद त्रिपाठी म्हणजेच पंकज त्रिपाठी देखील जबरदस्त कमबॅक करणार आहेत. मात्र, रसिकाच्या मते त्यांची लढत चौथ्या सीझनमध्ये संपुष्टात येऊ शकते.

'मिर्झापूर ३' पाहिल्यानंतर चौथ्या सीझनची उत्सुकता वाढेल
रिपोर्टनुसार, रसिका म्हणाली की प्रेक्षक एकदा सीझन ३ पाहिल्यानंतर सीझन ४ साठी त्यांची उत्सुकता आणखी वाढेल. मिर्झापूर ३ मध्ये प्रत्येक पात्राची कथा उलटसुलट करण्यात आली आहे. कालिन भैय्या यांचा मुलगा मुन्ना याचा मृत्यू झाला आहे. तर कालिन भैय्याला कसा तरी जीव वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय गुड्डू भैय्या गुन्हेगारीच्या दुनियेचा बादशाह बनला असून तो आता कालिन भैय्याच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. या सीझनच्या कथेत बीना त्रिपाठीचीही महत्त्वाची भूमिका आहे. बीना आता स्वतःच्या मुलाला बाहुबली बनवणार आहे.

मुन्ना भैया शोमध्ये परतणार का?
वास्तविक, काही दिवसांपूर्वी शोच्या निर्मात्यांनी मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदू शोमध्ये परत येऊ शकतो, असे संकेत दिले होते. यावेळी तो अधिक धोकादायक फॉर्ममध्ये पुनरागमन करेल. परंतु अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या पुनरागमनाबद्दल पुष्टी केली आहे की त्याचे पात्र यापुढे शोमध्ये दिसणार नाही. बॉलिवूड लाइफनुसार, दिव्येंदूने सांगितले होते की आता तो मिर्झापूर ३ चा भाग होणार नाही. 'मिर्झापूर ३'च्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर मेकर्स जूनमध्ये रिलीज करण्याचा विचार करत आहेत.

Web Title: The game of Kaleen Bhaiya and Guddu Bhaiya will end in 'Mirzapur 4'! Bina Bhabhi gave the hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.