'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ जाधवची वर्णी, नागराज मंजुळेंच्या वेब सीरिजमधून OTT वर करणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:10 PM2024-06-14T17:10:36+5:302024-06-14T17:14:59+5:30

Mataka King : सिद्धार्थची ही पहिलीच वेब सीरिज आहे. याबरोबरच सिद्धार्थ पहिल्यांदाच नागराज मंजुळेंसोबत काम करणार आहे.

siddharth jadhav to play important role in nagraj manjule matka king web series | 'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ जाधवची वर्णी, नागराज मंजुळेंच्या वेब सीरिजमधून OTT वर करणार पदार्पण

'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ जाधवची वर्णी, नागराज मंजुळेंच्या वेब सीरिजमधून OTT वर करणार पदार्पण

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी 'मटका किंग' या वेब सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. 'सैराट', 'फँड्री', 'झुंड' अशा सुपरहिट सिनेमांनंतर नागराज मंजुळे नवी कोरी वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन असलेल्या 'मटका किंग'मध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे. सईबरोबरच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये मराठी अभिनेतासिद्धार्थ जाधवची वर्णी लागली आहे. 

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीबरोबरच हिंदीमध्येही सिद्धार्थने त्याचा जम बसवला आहे. आता सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. ही सिद्धार्थची पहिलीच वेब सीरिज आहे. याबरोबरच सिद्धार्थ पहिल्यांदाच नागराज मंजुळेंसोबत काम करणार आहे. नुकतंच या वेब सीरिजचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिद्धार्थने हे पोस्टर शेअर करत वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याची हिंट चाहत्यांना दिली आहे. 'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही. पण, त्याला ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन असलेल्या 'मटका किंग' वेब सीरिजची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर करणार आहे. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोव्हर, कृतिका कामरा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: siddharth jadhav to play important role in nagraj manjule matka king web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.