'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी'मध्ये संजय नाथची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 07:02 PM2024-02-16T19:02:51+5:302024-02-16T19:03:41+5:30

'Raisinghani Vs Risinghani' Web Series : 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी'मध्‍ये जेनिफर विंगेट, करण वाही आणि रीम शेख हे डायनॅमिक त्रिकूट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या प्रतिभावान त्रिकूटासोबत अभिनेता संजय नाथ देखील आहे, जो स्‍वावलंबी व्‍यक्‍ती आणि टॉप क्रिमिनल वकिलांपैकी एक राजदीप रायसिंघानीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

Sanjay Nath's entry in 'Raisinghani Vs Risinghani' will be seen in the role of a lawyer. | 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी'मध्ये संजय नाथची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी'मध्ये संजय नाथची एन्ट्री, दिसणार वकीलाच्या भूमिकेत

सोनी लिव्‍हची विशेष सिरीज 'रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी'मध्‍ये जेनिफर विंगेट, करण वाही आणि रीम शेख हे डायनॅमिक त्रिकूट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या प्रतिभावान त्रिकूटासोबत अभिनेता संजय नाथ देखील आहे, जो स्‍वावलंबी व्‍यक्‍ती आणि टॉप क्रिमिनल वकिलांपैकी एक राजदीप रायसिंघानीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. राजदीप त्‍याच्‍या नीडर व्‍यक्तिमत्त्वासाठी, तसेच वकिल म्‍हणून नेहमी विजयी ठरण्‍यासाठी ओळखला जातो. निर्दयी दृष्टिकोन पण हुशार असलेला राजदीप तीक्ष्‍ण व प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेला आहे.

 संजय नाथ म्‍हणाला की, ''निर्मात्‍यांनी मला या भूमिकेसाठी विचारले तेव्‍हा मला त्‍याबाबत खात्री नव्‍हती, कारण मी गेल्‍या १० वर्षांमध्ये या फॉर्मेटमधील शो कधीच केलेला नव्‍हता. मला ऑफर्स मिळाल्‍या नाहीत असे नाही, पण दीर्घकालीन सिरीजप्रती कटिबद्धतेसाठी खूप वेळ लागतो आणि मी इतर प्रोजेक्‍ट्समध्‍ये व्‍यस्‍त होतो. पण, क्रिएटिव्‍ह टीमला माझ्या अभिनयामध्‍ये काहीतरी खास दिसले, जे अभिनेता म्‍हणून मला यापूर्वी कधीच जाणवले नाही. त्‍यांनी सतत विचारणा केल्‍यानंतर देखील मी सुरूवातीला संकोचलो. पण, काही ऑडिशन्‍स दिल्‍यानंतर मी ही संधी स्‍वीकारण्‍याचे ठरवले. 

इंटरेस्टिंग बाब म्‍हणजे शोचे क्रिएटिव्‍ह दिग्‍दर्शक, लेखक व दिग्‍दर्शक भावना, अनुराधा आणि अनिरूद्ध २ ते ३ तास माझ्यासोबत बसले आणि त्‍यांनी मला शोबाबत त्‍यांचा दृष्टिकोन व्‍यक्‍त केला, ज्‍यामुळे मी त्‍वरित भूमिकेचे पैलू व गुंतागूंतीशी जुडलो गेलो. या भूमिकेने मला मी कौतुक केलेल्‍या वेब सिरीजमधील लोगन रॉय आणि ब्‍लॅकलिस्‍टमधील रेमंड रेडिंग्‍टन सारख्‍या भूमिकांची आठवण झाली. या दोन्‍ही भूमिका साकारण्‍याची माझी इच्‍छा होती. या प्रोजेक्‍टचे असमकालीन स्‍वरूप बाजूला ठेवत मी या प्रकल्‍पाच्‍या मोठ्या क्षमतेकडे पाहिले आणि आव्‍हान स्‍वीकारण्‍याचे ठरवले. मी ही संधी देण्‍यासाठी आणि या भूमिकेला वास्‍तविकेत आणण्‍याकरिता माझ्यावर विश्‍वास दाखवण्‍यासाठी आभार मानतो. मी या भूमिकेच्‍या विविध शैलींना साकारण्‍याचा मनमुराद आनंद घेत आहे, असे संजय नाथने सांगितले. 

Web Title: Sanjay Nath's entry in 'Raisinghani Vs Risinghani' will be seen in the role of a lawyer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.