रितेश देशमुखच्या 'पिल' वेबसिरीजची घोषणा! ओटीटी माध्यमात दमदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 01:55 PM2024-06-22T13:55:12+5:302024-06-22T13:57:43+5:30

हिंदीत लोकप्रिय असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा झालीय (riteish deshmukh)

Riteish Deshmukh debut series PILL to premiere on 12th July | रितेश देशमुखच्या 'पिल' वेबसिरीजची घोषणा! ओटीटी माध्यमात दमदार एन्ट्री

रितेश देशमुखच्या 'पिल' वेबसिरीजची घोषणा! ओटीटी माध्यमात दमदार एन्ट्री

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. फार कमी आहेत जे ठराविक चौकट मोडून अभिनयाचा डंका जगभर गाजवतात. रितेशने आजवर 'धमाल', 'हाऊसफुल', 'एक विलन', 'क्या कूल है हम' अशा सिनेमांमधून बॉलिवूड गाजवलं. याशिवाय 'वेड', 'लय भारी', 'माऊली' इत्यादी मराठी सिनेमे रितेशने गाजवले. आता रितेश ओटीटी माध्यम गाजवायला सज्ज झालाय. रितेशच्या पहिल्यावहिल्या वेबसीरिजची घोषणा करण्यात आलीय.

रितेशचं ओटीटी माध्यमात पदार्पण

JioCinema Premium  वर रितेश देशमुखची पहिली वेबसीरिज PILL प्रीमियर करण्यासाठी सज्ज आहे. नुकतंच या वेबसिरीजचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. चांगलं विरुद्ध वाईट ही कथा या वेबसीरिजद्वारे बघायला मिळतेय. औषध उद्योगातील अंधकारमय आणि भ्रष्ट जगाविरुद्ध प्रामाणिक लढ्याची झलक या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. PILL ची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या RSVP Movies द्वारे केली आहे. राज कुमार गुप्ता यांनी वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या तारखेला पिल होणार रिलीज

JioCinema Premium वर १२ जुलै रोजी PILL चा प्रीमियर होणार आहे. रितेश देशमुखसोबत या सीरिजमध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेडिकलच्या दुनियेतील औषधांचा काळाबाजार अन् भ्रष्टाचार अशा गोष्टींवर वेबसीरिज भाष्य करणार आहे. रितेश लवकरच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

Web Title: Riteish Deshmukh debut series PILL to premiere on 12th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.