The Family Man 3 च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रीकांत तिवारी आणि त्याची टीम येतंय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:53 IST2025-10-27T15:49:55+5:302025-10-27T15:53:28+5:30
'द फॅमिली मॅन'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

The Family Man 3 च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रीकांत तिवारी आणि त्याची टीम येतंय!
Amazon Prime Video वरील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित मालिकांपैकी एक असलेल्या 'द फॅमिली मॅन' (The Family Man) चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी आता या नवीन सीझनच्या रिलीज डेटची घोषणा कधी होणार, याची माहिती जाहीर केली आहे.
आज सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडीओच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'द फॅमिली मॅन' सीझन ३ (The Family Man Season 3) संदर्भात एक खास अपडेट शेअर करण्यात आले. निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात चाहत्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत निर्मात्यांनी सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा उद्या करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
'द फॅमिली मॅन' ही सीरिज उत्तम कथानक, थ्रिल आणि विनोदामुळे लोकप्रिय आहे. या सीझनचे दिग्दर्शन पुन्हा एकदा राज आणि डीके यांनी केलंय. त्यांना यावेळी सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनीही दिग्दर्शनात मदत केली आहे. या सीझनमधून मनोज वाजपेयीसह प्रियामणी, शारिब हाश्मी, अलेशा ठाकूर आणि वेदांत सिन्हा हे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मुख्य म्हणजे या सीझनमध्ये जयदीप अहलावतसोबत निमरत कौर हीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Srikant Tiwari is on the way! #TheFamilyManOnPrime date out tomorrow! pic.twitter.com/ddF8O5NCqE
— prime video IN (@PrimeVideoIN) October 27, 2025
'द फॅमिली मॅन' मालिकेचा पहिला सीझन २०१९ मध्ये प्रसारित झाला होता आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर दुसरा सीझन २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही सीझनच्या दमदार यशानंतर आता तिसऱ्या सीझनबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा होणार आहे.