"सीनियर मुलीला पाहताक्षणी तिला प्रपोज केलं अन् पुढे.."; 'पंचायत'च्या सचिवजींचा धमाल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 02:13 PM2024-06-21T14:13:45+5:302024-06-21T14:16:44+5:30

'पंचायत'मधील सचीवजी अर्थात जितेंद्र कुमारने कॉलेजमध्ये एका सीनियर विद्यार्थिनीला प्रपोज केलं होतं. मग पुढे घडलेला धमाल किस्सा त्याने सांगितलाय (jitendra kumar, kota factory 3, panchayat)

panchayat 3 star jitendra kumar proposed seniour girl college funny incident | "सीनियर मुलीला पाहताक्षणी तिला प्रपोज केलं अन् पुढे.."; 'पंचायत'च्या सचिवजींचा धमाल किस्सा

"सीनियर मुलीला पाहताक्षणी तिला प्रपोज केलं अन् पुढे.."; 'पंचायत'च्या सचिवजींचा धमाल किस्सा

सध्या सोशल मीडियावर एका कलाकाराची खूप चर्चा आहे. हा कलाकार म्हणजे जितेंद्र कुमार. जितेंद्रच्या रिलीज झालेल्या दोन्ही वेबसिरीज सध्या चांगलाच गाजत आहेत. त्या म्हणजे 'पंचायत 3' आणि 'कोटा फॅक्टरी 3'. या दोन्ही वेबसिरीजमध्ये जितेंद्रने केलेला अभिनयाचं कौतुक होतंय. अशातच जितेंद्र ज्याला सर्व लाडाने 'जितू भय्या' म्हणतात, त्याने कॉलेज जीवनातला मजेशीर किस्सा सांगितला आहे. जेव्हा त्याने कॉलेजच्या एका सीनियर मुलीला पाहताक्षणी प्रपोज केलं होतं. काय घडलं होतं नेमकं?

सीनियर मुलीला पाहताक्षणी केलं प्रपोज मग जितूसोबत काय झालं

जितेंद्र कुमारने एका मुलाखतीत हा धमाल किस्सा सांगितलाय. एकदा जितू कॉलेजमधील एका सीनियर मुलीला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला. पुढचामागचा विचार न करता जितूने त्या मुलीला प्रपोजही केलं. पण ती सीनियर विद्यार्थिनी आहे हे त्याला माहित नव्हतं. त्या मुलीने जितूची चांगलीच शाळा घेतली. तेव्हापासून जितू कोणत्याही सीनियर मुलींपासून दूर राहू लागला. पुढेही जितूला अशीच एक मुलगी आवडली होती. पण ती सीनियर आहे म्हटल्यावर जितूने पुढे तिला काही विचारलं नाही. कारण आधीच्या अनुभवामुळे सीनियर मुलींपासून लांब राहण्याचा निर्णय जितूने घेतला होता.

जितेंद्र कुमारची ओटीटीवर हवा

जितेंद्र कुमारची सध्या ओटीटीमाध्यमात चांगलीच चर्चा दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी जितूची 'पंचायत 3' वेबसीरिज रिलीज झाली. ही वेबसीरिज गाजतेय तोच जितूची 'कोटा फॅक्टरी 3' ही सीरिज काल रिलीज झाली. या दोन्ही सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. जितू हा ओटीटी माध्यमावरील लाडका स्टार म्हणून ओळखला जातोय. आता सर्वांना 'पंचायत'च्या चौथ्या सीझनची उत्सुकता आहे.

Web Title: panchayat 3 star jitendra kumar proposed seniour girl college funny incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.