Saeed ला '6 फुट 3 इंच असलेल्या मुलीसोबत करायचे होते इंटीमेट सीन, अॅक्ट्रेसनं असं दूर केलं को-स्टारचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:09 IST2022-12-29T15:08:15+5:302022-12-29T15:09:56+5:30
महत्वाचे म्हणजे, हुमायूं सईदने या मालिकेत 'डॉक्टर हसनत खान'ची भूमिका वठवली आहे. जो 'प्रिन्सेस डायना' म्हणजेच एलिझाबेथ डेबिकीचा पार्टनर आहे.

Saeed ला '6 फुट 3 इंच असलेल्या मुलीसोबत करायचे होते इंटीमेट सीन, अॅक्ट्रेसनं असं दूर केलं को-स्टारचं टेन्शन
क्वीन एलिझाबेथ आणि तिच्या कुटुंबीयांवर आधारलेली नेटफ्लिक्स सीरीज 'द क्राउन'चा पाचवा सीझन (The Crown Season 5) आला आहे. या सिझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. यावेळी या शोमध्ये एक पाकिस्तानी अॅक्टरही सामील आहे. या अॅक्टरने नुकतेच सानिया मिर्झा आणि शोएब मालिकच्या (Sania Mirza Shoaib Malik) ओटीटी शो 'द मिर्जा मालिक शो'मध्ये (The Mirza Malik Show) खुलासा केला आहे की, त्याला आपली '6 फुट 3 इंचा'च्या को-एक्ट्रेससोबत इंटीमेट सीन्स शूट करताना फार टेन्शन आले होते. मात्र त्याच्या को-स्टारने त्याचे टेन्शन दूर करण्यासाठी एक खास ट्रिक शोधून काढली होती...
या पाकिस्तानी अॅक्टरचे नाव आहे, हुमायूं सईद (Humayun Saeed). हे पाकिस्तानी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. हुमायूं सईद नुकताच सानिया-शोएबच्या शोमध्ये आला होता. यावेळी तो म्हणाला, 'द क्राउन'मध्ये त्याची को-अॅक्ट्रेस एलिजबे डेबिकी (Elizabeth Debicki) आहे. तिची उंची 6 फुट 3 इंच एवढी आहे आणि हुमायूंने तिच्यासोबतच रोमँटिक सीन केले आहेत.
रोमँटिक सीन्ससंदर्भात होता अस्वस्थ, मग...
हुमायूं सईदने (Humayun Saeed) सांगितले, तो किसिंग सीन्ससंदर्भात अत्यंत नर्वस होता. मात्र, त्याच्या को-अॅक्ट्रेसने त्याला कम्फर्टेबल केले. जेव्हा त्याची अॅक्ट्रेस त्याचे कौतुक करत होती आणि त्याला मोटिव्हेट करत होती, तेव्हा हुमायूं लाजत होता. तो तिला म्हणाला, की ही ट्रिक काम करत आहे. यासाठी, एलिजाबेथने त्याला कॉम्प्लिमेंट करायला हवी; म्हणजे, त्याचे टेन्शन दूर होईल.
महत्वाचे म्हणजे, हुमायूं सईदने या मालिकेत 'डॉक्टर हसनत खान'ची भूमिका वठवली आहे. जो 'प्रिन्सेस डायना' म्हणजेच एलिझाबेथ डेबिकीचा पार्टनर आहे.