'तुला शिकवीन चांगला धडा'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं OTT वर पदार्पण; हिंदी वेबसीरिजमध्ये करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:04 AM2024-02-05T11:04:36+5:302024-02-05T11:07:04+5:30

Sharmishtha raut: या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या अगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

marathi-actress-sharmishtha-raut-play-role-in-raisinghani-vs-raisinghani-hindi-webseries | 'तुला शिकवीन चांगला धडा'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं OTT वर पदार्पण; हिंदी वेबसीरिजमध्ये करणार काम

'तुला शिकवीन चांगला धडा'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं OTT वर पदार्पण; हिंदी वेबसीरिजमध्ये करणार काम

सध्याच्या काळात टीव्हीपेक्षा प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे अधिक वळला आहे. वेबसीरिजसोबतच अनेक टीव्ही शो, सिनेमासुद्धा ओटीटीवर रिलीज होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक कलाकार आता ओटीटीवरच काम करताना दिसतात. बॉलिवूड कलाकारांसह अमेय वाघ (amey wagh), राधिका आपटे (radhika apte), मिथिला पालकर (mithila palkar), अमृता सुभाष (amruta subhash), अनुजा साठे (anuja sathe) यांसारखे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी वेबविश्वात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. यामध्येच आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पदार्पणात तिच्या पदरात हिंदी वेबसीरिज (hindi Webseries ) पडली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून नावारुपाला आलेली शर्मिष्ठ लवकरच एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

नाटक, मालिका, चित्रपट असा प्रवास करणारी शर्मिष्ठा लवकरच रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. येत्या १२ फेब्रुवारीला ही सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये शर्मिष्ठा नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, या सीरिजसोबतच शर्मिष्ठा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेमुळे चर्चेत येत आहे. शर्मिष्ठाने निर्मिती केलेली ही पहिली मालिका असून ती लोकप्रिय ठरत आहे.

Web Title: marathi-actress-sharmishtha-raut-play-role-in-raisinghani-vs-raisinghani-hindi-webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.