The Family Man 3: 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार नाही हे पात्र, मनोज वाजपेयीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:13 PM2024-05-24T16:13:30+5:302024-05-24T16:13:51+5:30

The Family Man 3: अभिनेता मनोज वाजपेयीचा बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. सीरिज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या सीरिजसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Manoj Vajpayee Reveals The Character Will Not Appear In The Family Man 3 | The Family Man 3: 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार नाही हे पात्र, मनोज वाजपेयीचा खुलासा

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार नाही हे पात्र, मनोज वाजपेयीचा खुलासा

अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee)चा बहुचर्चित वेबसीरिज 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या चित्रपटाच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांची प्रतीक्षा आहे. या मालिकेत मनोज श्रीकांत तिवारीची भूमिका साकारताना दिसणार आहे. राज आणि डीके यांनी बनवलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. यात मनोज व्यतिरिक्त प्रियामणी आणि शरीब हाश्मी देखील दिसत आहेत. मात्र, त्यात आणखी एक पात्र आहे, ज्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले आणि ते म्हणजे शरद केळकर (Sharad Kelkar). मात्र, शरद केळकर तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार नाही. याबाबत त्याने स्वतः सांगितले.
 
द फॅमिली मॅन या वेबसिरीजमध्ये शरद केळकरने अरविंदची भूमिका साकारली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्याला तिसऱ्या सीझनबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला घोषणा पोस्टमध्ये टॅग केले गेले नाही, त्यामुळे मी शोमध्ये नसण्याची शक्यता आहे. मी घोषणा वाचली, पण मला कोणीही कळवले नाही. त्यामुळे मला कल्पना नाही. अभिनेता म्हणाला, मला वाटतं हा सीझन इतर सीझनपेक्षा मोठा असेल.

शरद केळकर म्हणाला...
शरद केळकर पुढे म्हणाला की, त्यांना त्रास देण्यासाठी आणखी कोणीतरी व्यक्ती मिळेल. मला माहित नाही त्याने काय लिहिले आहे. मी त्यांच्याशी कोणतीही भेट घेतली नाही किंवा बोललो नाही. जर त्यांनी माझी व्यक्तिरेखा लिहिली असेल तर मी दिसेन, नाहीतर तुम्ही लोक मला मिस कराल. द फॅमिली मॅनमध्ये शरद केळकर अरविंद म्हणजेच मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या खास मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. श्रीकांतला नेहमी अरविंदचा हेवा वाटतो.

Web Title: Manoj Vajpayee Reveals The Character Will Not Appear In The Family Man 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.