'शेवटी थकून मी फरशीवरती आडवी झाले'; नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 04:09 PM2023-05-18T16:09:14+5:302023-05-18T16:10:08+5:30

Kubbra sai: अनुराग कश्यप यांच्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि कुब्रा यांच्यावर एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. हा सीन सीरिजमध्ये बराच गाजला होता.

kubbra sait reveals intimate scenes with nawazuddin siddiqui in sacred games | 'शेवटी थकून मी फरशीवरती आडवी झाले'; नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त

'शेवटी थकून मी फरशीवरती आडवी झाले'; नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त

googlenewsNext

मोठ्या पडद्यावरील चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील विविध मालिका यांना सध्याच्या काळामध्ये वेब सीरिज चांगलीच टक्कर देत आहेत. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये वेब सीरिजची क्रेझ वाढतांना दिसून येते. त्यातच नेटफ्लिक्सवर विशेष गाजलेली सीरिज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’(sacred games). अल्पावधीत लोकप्रियता मिळविलेल्या या सीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, कुब्रा सैत आणि राधिका आपटे हे मुख्य भूमिकेत झळकले होते. ही सीरिज प्रदर्शित होऊन ४ ते ५ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यातील काही किस्से चर्चिले जातात. यात अभिनेत्री कुब्रा सैत (kubbra sait) हिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत (nawazuddin siddiqui) कशाप्रकारे इंटिमेट सीन दिला याविषयी भाष्य केलं.

अनुराग कश्यप यांच्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि कुब्रा यांच्यावर एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. हा सीन सीरिजमध्ये बराच गाजला होता. परंतु, या सीनचं शूटिंग करणं दोन्ही कलाकारांना प्रचंड तापदायक ठरलं होतं. एका मुलाखतीत कुब्राने याविषयी सांगितलं.

'तो सीन शूटच्या पहिल्याच दिवशी शेवटी शूट केला होता. मला फक्त या सीनसाठी जायचं होतं आणि तो करायचा होता. पण, हा सीन करताना जवळपास ७ टेक घ्यावे लागले होते. हे ७ टेक होईपर्यंत कित्येक तास उलटले होते. हा सीन करणं इतकं त्रासदायक झालं होतं की, मी शेवटी इतकी थकले की जमिनीवरच मी आडवी झाले. माझ्यात साधं उभं रहायचीही ताकद नव्हती. मी हमसून हमसून रडत होते. त्यावेळी नवाज आणि अनुराग यांनी उचलून घट्ट पकडलं आणि त्यानंतर कट असा आवाज मला ऐकू आला, असं कुब्रा म्हणाली.

पुढे ती म्हणते, 'नवाजुद्दीन एक अभिनेता म्हणून मला आवडतो. एक व्यक्ती म्हणून तो छान आहेच. पण, प्रचंड लाजाळू आहे. आणि त्याच्यासोबत माझे सगळ्यात जास्त इंटिमेट सीन होते.मला असं वाटतंय या पृथ्वीवर जर कोणी सर्वात जास्त लाजाळू व्यक्ती असेल तर तो नवाज आहे. त्यामुळे त्या जबरदस्ती पकडून ते सीन करावे लागत होते. त्यावेळी मी त्याच्या गालावर किस करायचे आणि त्याला म्हणायचे चल ना आता इंटिमेट सीन करू या... हे माझं काम होतं आणि त्यासाठी तो माहौल तयार करणं गरजेचं होतं.'

दरम्यान, यापूर्वी कुब्राने सेक्रेड गेम्समधील तिच्या फ्रंट न्युडिटी सीनबद्दलही सांगितलं होतं. अनुरागने तिच्याकडून हा सीन ७ ते ८ वेळा करुन घेतला होता. पण, हा सीन झाल्यावर त्याने जाहीरपणे तिची माफी मागितली होती. 
 

Web Title: kubbra sait reveals intimate scenes with nawazuddin siddiqui in sacred games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.