'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:28 PM2024-06-11T13:28:25+5:302024-06-11T13:29:24+5:30

ट्रेलरवरुन तर सीरिजची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Kota Factory season 3 Trailer release starring Jitendra Kumar Mayur More | 'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

नेटफ्लिक्सवरील 'कोटा फॅक्ट्री 3' (Kota Factory 3) सीरिजची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरवरुन तर सीरिजची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंचायतचे सचिवजी आणि कोटा फॅक्टरीतील सर्वांचे लाडके जितू भैय्याने Aimers हे स्वत:चं कोचिंग सुरु केलं आहे. याचा विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर काही परिणाम होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सीरिजचा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे.

NEET-JEE च्या शर्यतीत विद्यार्थी गुरफटले गेले आहेत. कोटा फॅक्टरी जिथे विद्यार्थ्यांना हुशार बनवलं जात होतं तिथे आता मास प्रोडक्शन झालं आहे. विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले आहेत. यातून जितू भैय्या त्यांच्यासाठी आशेचं किरण आहे. जीतू भैय्या एक आदर्श शिक्षक आहेत यात शंकाच नाही. कोटा फॅक्टरी 3 चा ट्रेलर नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण सीरिज पाहून तर काय होईल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अंगावर शहारे आणणारा असा हा ट्रेलर आहे. येत्या 20 जून रोजी सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये विद्यार्थ्यांची घुसमट, गोंधळ आणि भविष्याची चिंता दाखवण्यात आली आहे. Kota Factory 3 ही TVF ची सर्वात जास्त पाहिली जाणारी वेबसीरिज आहे. यामुळेच याच्या तिसऱ्या सीझनकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. चाहत्यांनी कमेंट करत ट्रेलरचं, यातील डायलॉग्सचं कौतुक केलं आहे. 'हा टीव्हीएफचा शो आहे जो बेस्ट कंटेंटचं आश्वासन देतो' अशी कमेंट एकाने केली आहे. 

Web Title: Kota Factory season 3 Trailer release starring Jitendra Kumar Mayur More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.