'स्पेशल ऑप्स २' ची नवी रिलीज डेट जाहीर, कधी होणार प्रदर्शित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:01 IST2025-07-09T10:52:31+5:302025-07-09T11:01:14+5:30
'स्पेशल ऑप्स २' लवकरच... प्रकाश राजही विशेष भूमिकेत!

'स्पेशल ऑप्स २' ची नवी रिलीज डेट जाहीर, कधी होणार प्रदर्शित?
Special Ops Season 2 Release Date: के. के. मेनन (K.K.Menon) हे प्रतिभावंत कलाकारांपैकी एक आहे. पडद्यावर कमी वेळा दिसलेला पण चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षक व समीक्षक यांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा अभिनेता लोकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या 'स्पेशल ऑप्स २' या वेबसीरिजचा तर मोठा चाहतावर्ग आहे. ही सीरिज ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार होती. पण, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.
बहुप्रतिक्षित 'स्पेशल ऑप्स २'ची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. के. के. मेनन यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्रामवरून या वेबसीरिजच्या रिलीज डेटमध्ये बदल झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, म्हणूनच रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र चांगली बातमी ही आहे की, प्रेक्षकांना सर्व भाग एकत्र स्ट्रीम करता येतील". ही सीरिज आता ११ जुलैऐवजी १८ जुलै २०२५ रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
'स्पेशल ऑप्स २' ही सीरिज थ्रिलरने परिपुर्ण अशी आहे. यामध्ये के. के. मेनन हे पुन्हा एकदा स्पेशल एजंट हिम्मत सिंगच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवाद्यांचे कट उधळून टाकताना पाहायला मिळतील. या सिझनमध्ये प्रकाश राज यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग असून ते देखील विशेष एजंटच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यासोबत विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. 'स्पेशल ऑप्स २'कडून चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे