OTT वरील १ तास ४५ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा; ट्विस्ट असे की स्क्रीनवरून हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:52 IST2025-08-29T16:49:52+5:302025-08-29T16:52:49+5:30
हादरवून सोडणारी कथा अन् सस्पेन्स; ओटीटीवर हा थ्रिलर सिनेमा डोकं चक्रावून जाईल

OTT वरील १ तास ४५ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा; ट्विस्ट असे की स्क्रीनवरून हटणार नाही नजर
Suspense Thriller Movie: हल्ली ओटीटी माध्यमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत चालला आहे. त्यात सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असेच क्राइम थ्रिलर सिनेमे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहतात. अशीच दमदार कथा, ट्विस्ट आणि क्लायमॅक्स असलेला दाक्षिणात्य चित्रपट पाहून डोकं चक्रावून जाईल. या चित्रपटाचं नाव 'V1'आहे. जवळपास १ तास ४५ मिनिटांचा या सस्पेन्स थ्रिलर तेलुगु सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
पावेल नवगीनाथ दिग्दर्शित'V1' हा साऊथ सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सुरुवात एका अशा ट्विस्टने होते, ज्यामुळे हा सिनेमा अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटाचं कथानक एका खुनाच्या प्रकरणावर आधारित आहे. यामध्ये अग्नि नावाच्या इन्स्पेक्टरवर जो फॉरेन्सिक एक्सपोर्ट असतो तो कशाप्रकारे या प्रकरणाचा छडा लावतो, हे पाहून डोकं चक्रावेल. अंधाराची भीती असणारा हा अधिकारी एका महिलेच्या हत्येचा खटला सोडवण्यासाठी तपास करत राहतो.चित्रपटाची कथा खूप उत्कंठा वाढवणारी आहे.
दरम्यान, अवघ्या २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८५ कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटात अरुण कास्त्रो आणि विष्णुप्रिया पिल्लई या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जर अजूनही तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो Amazon Prime Video वर पाहू शकता.