सई ताम्हणकरनंतर नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये चमकणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 04:10 PM2024-06-24T16:10:32+5:302024-06-24T16:13:04+5:30

नागराज मंजुळेंच्या मटका किंगमध्ये विजय वर्माच्या विरुद्ध प्रमुख भूमिकेसाठी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे (nagraj manjule, matka king)

After Sai Tamhankar actress krutika kamra will seen in Nagraj Manjule Matka King | सई ताम्हणकरनंतर नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये चमकणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

सई ताम्हणकरनंतर नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये चमकणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

नागराज मंजुळेंच्या आगामी 'मटका किंग' सीरिजची सर्वांना उत्सुकता आहे. 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातंय. प्राईम व्हिडीओने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये 'मटका किंग' सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आली.  काहीच दिवसांपूर्वी या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकर काम करणार असल्याची घोषणा झाली. आता सईसोबतच मुख्य भूमिकेत एका बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

ही बॉलिवूड अभिनेत्री 'मटका किंग'मध्ये साकारणार भूमिका

'मटका किंग' वेबसीरिजमध्ये विजय वर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या वेबसीरिजसोबत विजयविरुद्ध काम करण्यासाठी एका बॉलिवूड अभिनेत्रीची निवड करण्यात आलीय. ही अभिनेत्री म्हणजे कृतिका कामरा. कृतिका वेबसीरिजमध्ये कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कृतिकाने याविषयी मीडियाशी संवाद साधला अन् म्हणाली, "मटका किंगचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे ही माझ्यासाठी एक रोमांचक संधी आहे. नागराज मंजुळे यांची दूरदृष्टी आणि कथा सांगण्याची कला अतुलनीय आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी माझे पात्र साकारण्यास उत्सुक आहे."

'मटका किंग' वेबसीरिजविषयी...

नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन असलेल्या 'मटका किंग' वेबसीरिजची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर करणार आहे. या वेबसीरिजमध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोव्हर, कृतिका कामरा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार, याशिवाय 'सैराट' गँग असणार का? हे थोड्याच दिवसांत पाहायला मिळेल.

 

Web Title: After Sai Tamhankar actress krutika kamra will seen in Nagraj Manjule Matka King

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.