बोल्डनेस आणि रोमांसचा हेवी डोस, OTTवर दाखल होतेय 'फोर मोर शॉट्स प्लीज ४'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:36 IST2025-07-01T18:36:05+5:302025-07-01T18:36:21+5:30

Four More Shots Please 4 : फोर मोअर शॉट्स प्लीज ही वेब सिरीज २०१९ मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून तिचे एकूण तीन सीझन झाले आहेत.

A heavy dose of boldness and romance, 'Four More Shots Please 4' is coming to OTT | बोल्डनेस आणि रोमांसचा हेवी डोस, OTTवर दाखल होतेय 'फोर मोर शॉट्स प्लीज ४'

बोल्डनेस आणि रोमांसचा हेवी डोस, OTTवर दाखल होतेय 'फोर मोर शॉट्स प्लीज ४'

फोर मोअर शॉट्स प्लीज (Four More Shots Please 4) या वेबसीरिजमध्ये तुम्ही चार मॉडर्न मैत्रिणीची इंटरेस्टिंग कहाणी नक्कीच पाहिली असेल. आतापर्यंत या मालिकेचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि तिन्हीही यशस्वी झाले आहेत. ही वेबसीरिज तिच्या बोल्ड आणि रोमँटिक कंटेंटमुळे चर्चेचा विषय बनली आहे. आता निर्मात्यांनी फोर मोअर शॉट्स प्लीजच्या चौथ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. लवकरच या सीरिजचा चौथा आणि शेवटचा सीझन प्रदर्शित होणार आहे.

फोर मोअर शॉट्स प्लीज ही वेब सिरीज २०१९ मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून तिचे एकूण तीन सीझन झाले आहेत, जे आधुनिक काळातील प्रेक्षकांना आवडल्या आहेत. आता या सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. वेबसीरिजच्या पहिल्या लूक पोस्टरसह त्याची घोषणा करण्यात आली आहे. फोर मोअर शॉट्स प्लीज ४ च्या या पोस्टरमध्ये सीरिजमधील कलाकार व्हीजे वाणी, कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता आणि मानवी गगरू यांची झलक पाहायला मिळतेय. जे स्विमिंग पूलमध्ये त्यांचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. फोर मोअर शॉट्स प्लीजच्या तिन्ही सीझनमध्ये खूप हॉट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत.


याशिवाय, ही सीरिज एका वयोगटातील चार मुलींची कथा दाखवते, ज्या समाजात आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत आहेत. काहींना त्यांच्या करिअरची चिंता आहे, तर अनेकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चिंता आहे. अशाप्रकारे मालिकेत चार वेगवेगळ्या कथा आहेत, ज्या खूपच रंजक आहेत. फोर मोअर शॉट्स प्लीजचा चौथा सीझन प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओने जाहीर केला आहे. मात्र त्याची रिलीज तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. येत्या काळात फोर शॉट्स प्लीजचा सीझन ४ फक्त प्राइम व्हिडिओवर ऑनलाइनवर पाहायला मिळेल.

Web Title: A heavy dose of boldness and romance, 'Four More Shots Please 4' is coming to OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.