मधुर भांडारकरच्या ‘मराठी’ची प्रतीक्षा

By Admin | Published: October 1, 2015 11:17 PM2015-10-01T23:17:32+5:302015-10-01T23:17:32+5:30

‘मधुर भांडारकर’ने एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून स्वत:ला प्रेक्षकांसमोर अनेकदा सिद्ध केले आहे. ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ , ‘फॅशन’ यांसारख्या चित्रपटांमधून वास्तवतेचे

Waiting for 'Marathi' for Madhur Bhandarkar | मधुर भांडारकरच्या ‘मराठी’ची प्रतीक्षा

मधुर भांडारकरच्या ‘मराठी’ची प्रतीक्षा

googlenewsNext

‘मधुर भांडारकर’ने एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून स्वत:ला प्रेक्षकांसमोर अनेकदा सिद्ध केले आहे. ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ , ‘फॅशन’ यांसारख्या चित्रपटांमधून वास्तवतेचे यथार्थ दर्शन त्यांनी प्रेक्षकांना घडविले . ‘कॅलेंडर्स गर्ल्स’ हा त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला...त्यांच्या पेज थ्री आणि फॅशन या दोन्ही चित्रपटांचा त्यावर प्रभाव आहे...खरेतर बॉलिवूडमध्ये त्यांचे यश हे मर्यादित राहिले असल्याने काहीसा बदल करण्यासाठी ते मराठी चित्रपटांकडे पुन्हा वळणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या चित्रपटांचा गाभा कोणता असेल, तर तो म्हणजे महिलाकेंद्रीत विषय. आजवरच्या मराठी चित्रपट निर्मितीचा इतिहास पाहिला, तर महिलांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट तयार करण्याची एक परंपराच पहायला मिळेल. त्यामध्ये ‘मोलकरीण’, ‘मानिनी’, ‘एकटी’, ‘उंबरठा’, ’मुक्ता’, ‘मी सिंधुताई सपकाळ’ अशा अनेक चित्रपटांची उदाहरणे देता येतील. भांडारकर यांच्याकडे असे चित्रपट दिग्दर्शित करण्याची क्षमता आहे, यामुळे मराठी चित्रपटालाच याचा फायदा होणार असून, चित्रपटांच्या प्रगतीच्या दृष्टीने ते सकारात्मक पाऊल ठरेल.

Web Title: Waiting for 'Marathi' for Madhur Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.