सेमीफायनलमध्ये विराटला मिळणार अनुष्काची साथ

By Admin | Updated: March 25, 2015 14:50 IST2015-03-25T14:42:06+5:302015-03-25T14:50:16+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाली असून उद्या रंगणा-या सेमीफायनलमध्ये ती तिचा प्रियकर व भारताचा स्टार प्लेअर विराट कोहलीला चिअर करताना दिसेल हे नक्की...

Virat will get Anushka in the semi-finals | सेमीफायनलमध्ये विराटला मिळणार अनुष्काची साथ

सेमीफायनलमध्ये विराटला मिळणार अनुष्काची साथ

>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २५ - वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार अवघ्या काही तासांवर आला असून ऑस्ट्रेलिया व भारतादरम्यान रंगणा-या सेमीफायनलकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारताला या सामन्यात विजय मिळावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत असतानाच आपले खेळाडूही विजयासाठी कंबर कसून तयार आहेत. आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंचे कुटुंबिय, त्यांच्या पत्नीही ऑस्ट्रेलियात उपस्थित राहतील. टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीही चांगल्या खेळीसाठी सज्ज असून त्याला चीअर करण्यासाठी त्याची 'लेडी लव्ह'  अभिनेत्री अनुष्का शर्माही मैदानात उपस्थित असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, 'एन एच १०' च्या यशामुळे सध्या भलतीच खुश असलेली अनुष्का सोमवारीच ऑस्ट्रेलियात दाखल झाली. तिने आणि विराटने एकत्र वेळ घालवला, एका रेस्टॉरंटमध्ये डिनरही केले. चाहत्यांचा वा मीडिया प्रतिनिधींचा त्रास होऊ नये म्हणून त्या दोघांसाठी खास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोणाचंही लक्ष आपल्याकडे जाऊ नये म्हणून ते अतिशय सावधानता बाळगत होते, एवढेच नव्हे तर रेस्टॉरंटमध्येही ते टॅक्सीने गेले. त्यांच्या या भेटीबद्दल बरीच गुप्तता बाळगण्यात येत आहे. पण असं असलं तरी गुरूवारच्या सामन्यात अनुष्का विराटला आणि टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात नक्कीच हजर असेल. आणि तिच्या उपस्थितीमुळे विराटही शानदार खेळ करत भारताला विजय मिळवून देईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.
विराटने नुकतेच ट्विटरवरून अनुष्काबद्दलचे प्रेम जाहीर केले होते. 'एन एच १०' चित्रपट पाहिल्यामुळे भारावलेल्या विराटने चित्रपटाचे आणि अनुष्काचे भरभरून कौतुक केले आणि तिचा उल्लेख 'माय लव्ह' असाही केला. 
 

Web Title: Virat will get Anushka in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.