आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3....! लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का आणि विराटने शेअर केला सुंदर फोटो
By गीतांजली | Updated: December 11, 2020 11:18 IST2020-12-11T11:04:34+5:302020-12-11T11:18:34+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या लग्नाला आज (शुक्रवारी) तीन वर्षे पूर्ण झाली.

आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3....! लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का आणि विराटने शेअर केला सुंदर फोटो
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या लग्नाला आज (शुक्रवारी) तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने विराट कोहलीने लग्नातील एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहलीने हा फोटो शेअर करताना लिहिले की, "तीन वर्षे आणि आयुष्यभर एकत्र." विराटची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. अवघ्या काही मिनिटातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे चाहते तिसर्या लग्नाच्या एनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतायेत. विराट कोहलीने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पण फोटो शेअर केला आहे.
अनुष्का शर्माने देखील विराटसोबतचा रोमाँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3, मिस यूअसं कॅप्शन अनुष्काने फोटोला दिलं आहे. सेलिब्रेटींनसह चाहत्यांनी अनुष्काच्या या फोटोवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. 11 डिसेंबर 2017 ला अनुष्का आणि विराट लग्नाच्या बंधनात अडकले.
विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत. आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. अनुष्का शर्मा अनेकवेळा आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत असते.