एनएच१० मधील अनुष्काच्या परफॉर्मन्सवर विराट फिदा
By Admin | Updated: March 18, 2015 12:32 IST2015-03-18T11:57:25+5:302015-03-18T12:32:58+5:30
'एनएच१०' चित्रपटातील परफॉर्मन्ससाठी विराट कोहलीने प्रेयसी अनुष्का शर्माचे भरभरून तिचा उल्लेख 'माय लव्ह' असा केला आहे.

एनएच१० मधील अनुष्काच्या परफॉर्मन्सवर विराट फिदा
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १८ - 'एनएच१०' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातील परफॉर्मन्सबद्दल अभिनेत्री अनुष्का शर्माचे बरेच कौतुक होत असल्याने सध्या ती खूप खुश आहे. तिच्या या आनंदात आता आणखी भर पडली आहे आणि त्याचे कारण आहे तिचा प्रियकर क्रिकेटपटू विराट कोहली.. वर्ल्डकपमध्ये व्यस्त असलेल्या विराटने खास वेळ काढून अनुष्काचा हा चित्रपट पाहिला आणि तिचे भरभरून कौतुक केले. ' आत्ताच मी "एनएच १०" बघितला आणि थक्क झालो. चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे आणि माझी प्रेयसी अनुष्काने तर उत्कृष्ट काम केले आहे. मला तिचा अभिमान वाटतो' असे ट्विट विराटने केले आहे. विराटच्या या कौतुकोद्गारांमुले अनुष्का सध्या सातव्या आसमानात आहे.
विराट आणि अनुष्काची प्रेमकहाणी जगजाहीर आहे. अनेकवेळा त्या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटोही प्रसिद्ध झाले. भारतीय खेळाडू परदेश दौ-यावर असताना अनुष्का ब-याच वेळेस विराटसोबत दिसून आली. पहिल्यांदा ते दोघे त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास तयार नव्हते, पण नंतर मात्र विराटने उघडपणे अनुष्काबद्दलचे प्रेम व्यक्त केले. सेंचुरी झळकवल्यानंतर अनुष्काच्या दिशेने दिलेले फ्लाईंग किस असो किंवा मग आज ट्विटरवरून तिचे केलेल कौतुक...अनुष्कावर त्याचे किती प्रेम आहे, हेच यातून दिसून येते.