विराट-अनुष्काचं न्यूयॉर्कमध्ये आऊटिंग

By Admin | Updated: July 13, 2017 14:57 IST2017-07-13T14:57:36+5:302017-07-13T14:57:36+5:30

विराटने बुधवारी संध्याकाळी अनुष्कासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

Virat-Anushka's outing in New York | विराट-अनुष्काचं न्यूयॉर्कमध्ये आऊटिंग

विराट-अनुष्काचं न्यूयॉर्कमध्ये आऊटिंग

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांमधील प्रेमप्रकरण नेहमीच चर्चेचा विषय असतं. विशेष म्हणजे दोघांचं नात कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. विराट आणि अनुष्का कार्यक्रमांनाही एकत्र हजेरी लावतात. नेहमीच चर्चेत असणारं हे कपल सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. दोघंही तिथे सुट्टी एन्जॉय करत आहेत. विराटने बुधवारी संध्याकाळी अनुष्कासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. त्या फोटोला "मच निडेडे ब्रेक" असं कॅप्शन त्याने दिलं आहे. न्यूयॉर्कमधील आऊटिंगचे फोटो त्या दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ते न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसत आहेत. 
 
सध्या बॉलिवूडमध्ये आयफा अॅवॉर्डची धूम सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील बरेच कलाकार न्यूयॉर्कमध्ये आहेत. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडणार असल्यामुळे त्याचाही वेगळाच उत्साह बघायला मिळतो आहे. सोशल मीडियावर न्यूयॉर्कमधील त्यांचे फोटोही शेअर केले जात आहेत. आयफाच्या निमित्ताने बी टाऊनचे स्टार न्यूयॉर्कमध्ये असताना काही सेलिब्रिटी आधीपासूनच तेथे आऊटिंगचा आनंद घेत आहेत. 
 
विराट आणि अनुष्का दोघंही कार्यक्रमांना, एअरपोर्टवर एकत्र दिसतात. अर्थातच त्यावेळी सगळ्यांच्या नरजा त्या दोघांवर असतात.. काही दिवसांपूर्वी विराटने अनुष्कासोबतच्या काही स्पेशल गोष्टी सांगून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. एका मुलाखती दरम्यान विराटने अनुष्काविषयी आणि तिच्याबरोबर घालवलेल्या वेळेविषयी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.      
 
 "मैंने कभी सोचा नहीं था ये दिन आएगा… वो आया अँण्ड आय एबल टू शेअर विथ हर…" असे उद्गार टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हीच्या बद्दल काढले होते. यां दोघांच्या लव्ह अफेअरविषयी आपण गेल्या काही वर्षांपासून ऐकतो आहे. पण दोघांनीही अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. आयसीसीच्या एका मुलाखतीत विराट अनुष्काविषयी दिलखुलास बोलला आहे. विराटच्या या वाक्यातूनच दोघांमधलं स्वीट रिलेशन दिसून येतं. 
आयफा अॅवॉर्डसाठी शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, सुनिल शेट्टी, बिपाशा बासू हे कलाकार आधीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. 
 

Web Title: Virat-Anushka's outing in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.