चित्रपट हिंदी असो किंवा मराठी त्यात एखाद्या तरी बड्या खलनायकाची भुमिका प्रेक्षकांनी शेवट पर्यंत ...
विजय आंदळकर साकारणार विलन
/> चित्रपट हिंदी असो किंवा मराठी त्यात एखाद्या तरी बड्या खलनायकाची भुमिका प्रेक्षकांनी शेवट पर्यंत खिळवून ठेवते. मराठी चित्रपटांमध्ये देखील आता सशक्त खलनायक पाहायला मिळत आहेत. ७०२ दिक्षित या चित्रपटामध्ये हिरोचा रोल केल्यानंतर विजय आंदलकर त्याच्य आगामी चित्रपटामध्ये खलनायकाच्या भुमिकेत त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. कोणत्याही सेफ्टी शिवाय या चित्रपटातील फाईट स्नीस शुट करण्यात आलेले आहेत. शुटींग सुरू असताना फाईट सीक्वेनन्सच्या वेळी विजय जखमी झाला होता. या चित्रपटातील फाईट सीन हे मराठीतील फस्ट रिअल फाईट सीन असल्याचे तो सांगतो. रोमँटिक हिरोचा बिरूद मिरवणारे हिरो देखील आता खलनायकाची भुमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. आता विजयला खलनायकाच्या भुमिकेत प्रेक्षक स्वीकारतील का हे लवकरच समजेल.