Next

चतुरस्त्र गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:20 IST2016-09-08T09:29:29+5:302016-09-08T15:20:48+5:30

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. आशाताई चतुरस्त्र गायिका म्हणून ओळखल्या जातात. भावगीते, भक्तीगीते, पॉप, लावणी, ठुमरी, शास्त्रीय, गजल अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी काही गाणी या ठिकाणी देत आहोत.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. आशाताई चतुरस्त्र गायिका म्हणून ओळखल्या जातात. भावगीते, भक्तीगीते, पॉप, लावणी, ठुमरी, शास्त्रीय, गजल अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी काही गाणी या ठिकाणी देत आहोत.कारवाँ चित्रपटातील पिया तू हे गाणं आजही अजरामर आहे.यादों की बारात चित्रपटातील चुरा लिया है तुमने हे गाणं खूपच रोमँटिक आहे.तिसरी मंझील चित्रपटातील ओ मोरे सोना रे गाण्यातील नजाकत वेगळीच आहे.उमराव जान चित्रपटातील दिल चिज क्या है हे गाणं अजूनही लोकांना आवडते.किस्मत चित्रपटातील शमशाद बेगम यांच्यासोबत आशातार्इंनी गायलेले गाणं इतक्या वर्षानंतरही ताजे वाटते.उमराव जान चित्रपटातील इन आँखो की मस्ती में हे गाणं लोकांना खूप आकर्षित करते.काश्मीर की कली चित्रपटातील इशारो इशारों में दिल लेने वाले हे उडत्या चालीचे गाणे लोकांच्या स्मरणार्थ आहे.सीआयडी चित्रपटातील मोहम्मद रफीसोबतचे हे गाणं ५० वर्षानंतरही लोकांना आवडते.नया दौर चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबतचे गाणं खूप लोकप्रिय आहे.हम दोनो चित्रपटातील अभी ना जाओ छोडकर हे गाणं सर्वकालिक लोकप्रिय आहे.मेरा साया चित्रपटातील हे गाणं उत्कृष्ट गाण्यापैकी एक आहे.फागून चित्रपटातील एक परदेसी मेरा हे गाणं लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.तिसरी कसम मधील हे गाणं पानांच्या गाण्यातील सर्वोत्कृष्ट आहे.हरे रामा हरे कृष्ण चित्रपटातील दम मारो दम हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय आहे.