Ashwini Mahangade fame Aai Kuthe Kaay Karte | या अनोख्या गिफ्टमुळे वडिलांच्या आठवणीत अश्विनी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 15:47 IST2021-11-11T15:46:50+5:302021-11-11T15:47:10+5:30
आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे ही घराघरात पोहचली. काही दिवसांपूर्वीच अश्विनीचा वाढदिवस झाला. तिचा वाढदिवस तिने अनोख्या पद्धतीने साजरा करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर शेअर केला होता. आता तिला एका खास व्यक्तीकडून वाढदिवसानिमित्त एक खास गिफ्ट मिळालं आहे. याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. अश्विनीला तिच्या भावाने वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट दिलयं ज्यामध्ये अश्विनीचा आणि तिच्या वडिलांचा फोटो दिसून येतोय. हे गिफ्ट पाहून अश्विनी खूपच भाऊक झालेली दिसून आली. अश्विनीला हे गिफ्ट खूपच आवडलयं.