इटलीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय-प्रिया मराठे
By Admin | Updated: July 17, 2017 00:51 IST2017-07-17T00:51:06+5:302017-07-17T00:51:06+5:30
अभिनेत्री प्रिया मराठे परदेशातील निळाशार सागरी किनारा, इटली, फ्रान्स आणि स्पेनसारख्या आकर्षक लोकेशन्सला भेट देत मस्त

इटलीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय-प्रिया मराठे
अभिनेत्री प्रिया मराठे परदेशातील निळाशार सागरी किनारा, इटली, फ्रान्स आणि स्पेनसारख्या आकर्षक लोकेशन्सला भेट देत मस्त व्हेकेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. तिने भेट दिलेल्या सगळ्या सुंदर लोकेशन्सची फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत प्रिया मराठे ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. तिच्या या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. इटलीमधल्या नयनरम्य स्थळांना भेट देत तिथली संस्कृती माहिती जाणून घेण्यात तिला रस असल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहेत. शेअर केलेल्या फोटोत ती निवांतपणे एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियामुळे क्षणाक्षणाला रसिकांच्या प्रतिक्रिया येत असतात.
तसेच चाहत्यांशी थेट कनेक्ट होण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती अपडेट करताना दिसते.