दहशतवादावर आधारित अमेरिकेतील नाट्य '२४'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:16 IST2016-01-16T01:19:47+5:302016-02-07T14:16:54+5:30

दहशतवादावर आधारित अमेरिकेतील नाट्य '२४' भारतीय दूरचित्रवाणीने स्वीकारल्यानंतर अभिनेता अनिल कपूर आता एम्मी पुरस्कार विजेत्या 'मॉडर्न फॅमिली'ला छोट्या पडद्यावर ...

US based drama '24' | दहशतवादावर आधारित अमेरिकेतील नाट्य '२४'

दहशतवादावर आधारित अमेरिकेतील नाट्य '२४'

शतवादावर आधारित अमेरिकेतील नाट्य '२४' भारतीय दूरचित्रवाणीने स्वीकारल्यानंतर अभिनेता अनिल कपूर आता एम्मी पुरस्कार विजेत्या 'मॉडर्न फॅमिली'ला छोट्या पडद्यावर आणणार आहे. असे संकेत त्याने दिले आहेत.

अमेरिकेतील मालिकांमध्ये अनिल कपूर चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या संदेशात त्याने म्हटले की, चाहत्यांसाठी मॉडर्न फॅमिलीची नवी निर्मिती देण्यापासून मी स्वत:ला रोखू शकत नाही. भारतीय चाहत्यांना येत्या काळात ही संधी मिळणार आहे. अनिल कपूरने याविषयीचा चार फोटोंचा कोलाज शेयर केला आहे. एका छायाचित्रात त्याची निर्माती असलेली कन्या रिया ही एका महिलेशी सेटवर संवाद साधताना दिसते. दुसर्‍या एका छायाचित्रात अमेरिकन अभिनेता जेस्सी टेलर फग्यरुसन दिसत आहे. अनिलच्या या प्रयोगाबाबत सध्या तरी आपण चर्चाच करू शकतो. अमेरिकन माध्यमातील हे नाट्य कितपत भारतीयांच्या अंगवळणी पडणार हे नंतरच कळेल.

Web Title: US based drama '24'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.