‘गणवेश’ शिवायला शिंपीच सापडेना
By Admin | Updated: June 24, 2015 22:59 IST2015-06-24T22:59:16+5:302015-06-24T22:59:16+5:30
आजच्या रेडिमेड फॅशनेबल जगात शिंप्याला विचारतंय कोण? पण जर तो शिंपी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूट शिवणारा असेल तर? लाईन लागेल ना भौंव! पण अशीच

‘गणवेश’ शिवायला शिंपीच सापडेना
आजच्या रेडिमेड फॅशनेबल जगात शिंप्याला विचारतंय कोण? पण जर तो शिंपी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूट शिवणारा असेल तर? लाईन लागेल ना भौंव! पण अशीच काहीतरी गंमत झाली गणवेशच्या अतुल जगदाळे यांची. त्यांच्या गणवेशसाठी शिंपीच सापडेना. किशोर कदम, स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे, नागेश भोसले, गणेश यादवपासून थेट दिलीप प्रभावळकर सगळ्यांनीच हात टेकले, पण मनासारखा शिंपी काही सापडेना? शेवटी हा गहन प्रश्न सोडविण्यासाठी गुरू ठाकूर आणि अतुल जगदाळे यांनी एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एका अष्टपैलू - हरहुन्नरी कलाकाराचे नाव पक्के केले, ते म्हणजे सुहास पळशीकर यांचे. चित्रपटाचे नावच ‘गणवेश’ म्हटल्यावर शिंप्याचा किती महत्त्वाचा रोल असणार हे पळशीकरांना सांगायची गरजच पडली नाही. त्यांच्या होकारातच सगळं काही आलं. शेवटी कलाकारच कलेचे महत्त्व जाणतो म्हणतात ना!