बेरोजगार आमिर खान

By Admin | Updated: October 3, 2014 00:17 IST2014-10-03T00:17:39+5:302014-10-03T00:17:39+5:30

आमिर खानच्या जीवनात बेरोजगारीचा काळ नियमित येत असतो. पीकेचे शुटिंग संपले आहे, आता सत्यमेव जयतेचे काही एपिसोड्स शूट करायचे आहेत.

Unemployed Aamir Khan | बेरोजगार आमिर खान

बेरोजगार आमिर खान

>आमिर खानच्या जीवनात बेरोजगारीचा काळ नियमित येत असतो. पीकेचे शुटिंग संपले आहे, आता सत्यमेव जयतेचे काही एपिसोड्स शूट करायचे आहेत. हे दोन प्रोजेक्ट्स सोडले, तर त्यानंतर आमिरकडे काम नाही. अद्याप त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणाही झालेली नाही. पीके डिसेंबरमध्ये रिलीज होत असल्याने चित्रपट रिलीज होइर्पयत तो प्रमोशनमध्ये बिझी असणार आहे. इतर कलाकार एका चित्रपटाचे शुटिंग करत असताना चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत असतात. एखादी दमदार स्क्रिप्ट नाही मिळाली तरी चित्रपटांना होकार देत असतात. त्यामुळे ते चर्चेत असतात. शिवाय एखादा चित्रपट आपटला तरी दुसरा तयार असल्याने त्यांना मार्केटमधून बाहेर पडण्याची भीती कमी असते. आमिरला मात्र ही भीतीच नाही. तो अगदी आरामात काम करत असतो. त्याला जोर्पयत स्क्रिप्ट आवडत नाही, तोर्पयत त्याचा होकार मिळत नाही. स्क्रिप्ट आवडली तर तो मन लावून चित्रपटासाठी काम करत असतो. सध्या त्याच्याकडे भरपूर स्क्रिप्टस् आल्या आहेत. आता त्यातून एखादी स्क्रिप्ट आवडली, तर आमिरला रोजगार मिळू शकेल.

Web Title: Unemployed Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.