उमेशचा ‘जीआर’
By Admin | Updated: April 18, 2015 23:42 IST2015-04-18T23:42:20+5:302015-04-18T23:42:20+5:30
वेगवेगळ््या भूमिका करीत उमेश कामतने आपला ठसा उमटवला आहे. चॉकलेट बॉयच्या चौकटीत न अडकता आता त्याने हटके भूमिका करायचे ठरवले आहे.

उमेशचा ‘जीआर’
वेगवेगळ््या भूमिका करीत उमेश कामतने आपला ठसा उमटवला आहे. चॉकलेट बॉयच्या चौकटीत न अडकता आता त्याने हटके भूमिका करायचे ठरवले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘जीआर’ चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत असेल. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर विनोदी पद्धतीने भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सयाजी शिंदे, वर्षा उसगावकर यांच्याही भूमिका आहेत.