उई माँ... सलमान खान आहे 64 वर्षांचा!
By Admin | Updated: January 16, 2017 12:40 IST2017-01-16T12:40:55+5:302017-01-16T12:40:55+5:30
फोटोमध्ये केलेली बनवाबनवी आणि फोटोशॉपचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापत याच्या सहाय्याने काही सोशल टग्यांनी सलमान खानचं बनावट व्होटर आयडी कार्ड बनवलं असून त्याला 64 वर्षांचं दाखवलं आहे

उई माँ... सलमान खान आहे 64 वर्षांचा!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - फोटोमध्ये केलेली बनवाबनवी आणि फोटोशॉपचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापत याच्या सहाय्याने काही सोशल टग्यांनी सलमान खानचं बनावट व्होटर आयडी कार्ड बनवलं असून त्याला 64 वर्षांचं दाखवलं आहे. यामुळे भारतामध्ये टॅलेंटची कमी नसल्याचं तसेच विनोदबुद्धीचा असा वापर केला जात असल्याचं दिसून आलंय.
सलमानचा फोटो, सलीम खान यांचं त्याचे वडील म्हणून नाव आणि सलमानचं वय 64 या गोष्टी या व्होटर कार्डवर नमूद करण्यात आल्या आहेत. अत्यंत खरं वाटावं असं हे कार्ड आहे. अर्थात, तुम्ही फोटो बघितलात तर लक्षात येतं की हा इंटरनेटवरून डाऊनलोड केलेला आहे.
हैदराबादमधल्या महापालिका निवडणुकांच्या दरम्यान गेल्या वर्षी हा प्रकार करण्यात आल्याचं दिसून आलं. सलमानचा फोटो, भलत्याच्याच आयडी वर लावून हे फेक आयडी कार्ड बनवण्यात आलं. सरकारी अधिकाऱ्यांच्याही हा प्रकार लक्षात आला नसून एक वर्ष जुनी असलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर 64 वर्षांचा सलमान अशी व्हायरल होत आहे.
Salman khan enrolled as Hyderabad voter