करोडो हिटस असलेल्या ‘झिरो’ला तुषार आपटेचे संगीत
By Admin | Updated: December 25, 2015 02:09 IST2015-12-25T02:09:48+5:302015-12-25T02:09:48+5:30
आंतरराष्ट्रीय पॉप गायक क्रिस ब्राऊन याचा झिरो या गाण्याच्या व्हिडीओला तरुणांनी अक्षरश: उचलून धरले आहे. पाहता पाहता, या व्हिडीओला चक्क दीड कोटींहून अधिक हिट्सदेखील मिळाले आहेत

करोडो हिटस असलेल्या ‘झिरो’ला तुषार आपटेचे संगीत
आंतरराष्ट्रीय पॉप गायक क्रिस ब्राऊन याचा झिरो या गाण्याच्या व्हिडीओला तरुणांनी अक्षरश: उचलून धरले आहे. पाहता पाहता, या व्हिडीओला चक्क दीड कोटींहून अधिक हिट्सदेखील मिळाले आहेत, पण यामागचा खरा हिरो आहे तो मराठमोळा तुषार आपटे. कारण हाच मराठमोळा चेहरा हिरो या गाण्याचा गीतकार, संगीतकार व निर्मातादेखील आहे. आश्चर्य ना, पण हे ऐकून अभिमान नक्कीच वाटला असेल, यात शंकाच नाही. सध्या हा मराठी
हिरो लॉस एंजेलिसला स्थायिक आहे. त्याला संगीताचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्याची आईही उत्तम नर्तिका व कलाकार आहे, तसेच तुषारने बारावीत असताना संगीत या विषयामध्ये
यश मिळविल्यानंतर, त्याने सिडनी येथे सिडनी कॉन्झर्व्हेटोरियन
आॅफ म्युझिक येथे संगीताचे
शिक्षण घेतले, तसेच २०१४
मध्ये टोरांटो येथे एका
संगीत कार्यशाळेसाठी आॅस्ट्रेलियामधूनच तुषारची निवड करण्यात आली होती. या कार्यशाळेतच तुषारने झिरोची निर्मिती केली आणि हेच करोडो रसिकांच्या मनात उतरलेले गाणे आंतरराष्ट्रीय पॉपगायक क्रिस ब्राऊन याने स्वरबद्ध केले.