तीन दिवसांत तीन दशलक्ष लोकांनी पाहिला 'नीरजा' ट्रेलर
By Admin | Updated: December 21, 2015 17:42 IST2015-12-21T17:42:06+5:302015-12-21T17:42:06+5:30
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा आगामी चित्रपट 'नीरजा' येत असून या चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्युबच्या संकेतस्थळावर लॉन्च करण्यात आला आहे. नीरजा चित्रपटाचा ट्रेलर तीन दिवसांपूर्वी यू-ट्युबवर अपलोड

तीन दिवसांत तीन दशलक्ष लोकांनी पाहिला 'नीरजा' ट्रेलर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा आगामी चित्रपट 'नीरजा' येत असून या चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्युबच्या संकेतस्थळावर लॉन्च करण्यात आला आहे. नीरजा चित्रपटाचा ट्रेलर तीन दिवसांपूर्वी यू-ट्युबवर अपलोड करण्यात आला होता. या तीन दिवसांत हा ट्रेलर ३o लाख लोकांनी बघितला असल्याचे अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या ट्विटवर म्हटले आहे.
दिग्दर्शक राम माधवानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासह शबाना आझमी, शेखर रावजीयनी यांनी भूमिका साकारल्या आहेत.
नीरजा हा चित्रपट नीरजा भनोट या एअरहोस्टेसवर आधारित असून हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.