'जॉली एलएलबी'चा येणार तिसरा सिक्वेल
By Admin | Updated: February 22, 2017 16:47 IST2017-02-22T16:26:52+5:302017-02-22T16:47:01+5:30
अभिनेता अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी -2 या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा सिक्वल येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

'जॉली एलएलबी'चा येणार तिसरा सिक्वेल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अभिनेता अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी -2 या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा सिक्वल येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जॉली एलएलबी -3 निश्चितपणे होणार असून आम्ही या तिस-या सिक्वेलसाठी आत्तापासूनच कामाला लागलो आहोत. तसेच, याबाबत आमच्याकडे दोन-तीन चांगल्या कल्पना असल्याचे फॉक्स स्टार स्टुडिओचे सीईओ आणि निर्माते विजय सिंह यांनी सांगितले.
सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या जॉली एलएलबीमध्ये अभिनेता अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर दुस-या सिक्वेलमध्ये अभिनेता अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या तिस-या सिक्वेलमध्ये प्रमुख भूमिकेत कोणाला घेतले जाणार? असा प्रश्न विचारला असता विजय सिंह यांनी सांगितले की, ही बाब अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही.
दरम्यान, जॉली एललबी 2 प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 100 कोटींच्या घरात कल्ला जमावला आहे.