आला रे आला परशाच्या चित्रपटाचा टीझर आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 17:36 IST2017-04-24T17:32:13+5:302017-04-24T17:36:59+5:30
सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर याच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे

आला रे आला परशाच्या चित्रपटाचा टीझर आला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर याच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. एफयू असं या सिनेमाचं नाव आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू चित्रपट तरुणाईला लक्षात घेऊन बनवल्याचे दिसून येते. कॉलेजमधील एका रॉक बॅण्डमध्ये गाणाऱ्या आकाशचा वेस्टर्न लूक यात पाहावयास मिळतो. बोल्ड लूकमधील संस्कृती बालगुडेची झलकही यात दाखविण्यात आलीय.त्याचवेळी सत्या मांजरेकरचीही झलक यात पाहावयास मिळते.
एफयूचे टीझर निराशादायक वाटते. टीझरमध्ये संवादांपेक्षा म्युझिकचा अधिकाधिक भरणा करण्यात आल्याचे दिसून येते. संपूर्ण टीझरमध्ये आकाशच्या तोंडामध्ये फक्त एक डायलॉग आहे. नॉर्मल क्लासेसमध्ये एक्स्ट्रॉ शिकवत नाहीत ना. ते एक्स्ट्रा क्लासेसमध्ये नॉर्मली शिकवतात. हा एकमेव संवाद आकाशने म्हटला असून तोही त्याच्या आवाजात नाहीये. यामध्ये आकाशचा आवाज डब करण्यात आल्याचे लगेच कळून येते. रॉक बॅण्डमधला गिटारिस्ट आणि बॉक्सर असे आकाशचे दोन लूक यात दाखविण्यात आले आहेत.
सचिन खेडेकर, शरद पोंक्षे, बोमन इराणी, भारती आचरेकर, इषा कोप्पीकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर यांच्या भूमिका असलेला एफयू येत्या 2 जूनला प्रदर्शित होईल.