संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 04:51 PM2022-06-01T16:51:15+5:302022-06-01T16:51:53+5:30

Singer KK Death : प्रसिद्ध गायक केकेचं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year | संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

googlenewsNext

प्रसिद्ध गायक केके(Singer KK)चं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेवटच्या काळात तो कोलकाता येथे एका कॉन्सर्टसाठी आले होते. कॉन्सर्ट दरम्यान त्याची प्रकृती खालावली, त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये आणण्यात आले. तिथे तो पडला. त्यानंतर त्याला कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाहिले तर २०२२ हे वर्ष भारतीय गायन क्षेत्रासाठी अत्यंत वाईट ठरत आहे. केके व्यतिरिक्त इतरही अनेक मोठे स्टार्स आहेत, ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आहे. 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  


या वर्षी ६ फेब्रुवारी, २०२२ रोजी भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. केवळ भारतच नाही तर पाकिस्तानसह इतर अनेक देशांनी या घटनेवर शोक व्यक्त केला होता.

बप्पी लहिरी (Bappi Lahiri)
 

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या नऊ दिवसांतच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनीही जगाचा निरोप घेतला. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डिस्को किंग म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी जवळपास महिनाभर रुग्णालयात दाखल होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पण दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

सिद्धू मुसेवाला

गेल्या रविवारी पंजाबमधील मानसा येथील जवाहरके गावात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी त्यांच्या कारला घेरले आणि गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुसेवाला यांच्या निधनाने भारत, पाकिस्तानसह इतर अनेक देशांतील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर पंजाबमधील मूसेवाला यांचे समर्थक सरकार आणि पोलिसांविरोधात निदर्शने करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या गोल्डी ब्रारने काही वेळातच या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गोल्डी ब्रार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सहकारी आहे.

Web Title: The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.