Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:18 IST2025-08-06T20:17:27+5:302025-08-06T20:18:19+5:30

Ankita Lokhande Mumbai Police : घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी आणि मैत्रीण झालेली बेपत्ता

Thanks to Mumbai Police as two missing girls found safe Information given by Actress Ankita Lokhande | Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती

Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरात घरकाम करणाऱ्या हाऊस हेल्परची बेपत्ता झालेली मुलगी अखेर  बुधवारी सापडली. अंकिता लोखंडेने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. अंकिताच्या मोलकरणीची मुलगी आणि तिची मैत्रीण बेपत्ता झाली होती. त्या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार तिने दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे केली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत घटना सांगितली होती. त्यानंतर तिने पोलीस आणि लोकांना मदतीचे आवाहन केले होते. आज अंकिताने त्या बेपत्ता मुली सापडल्याचे सांगत, मुंबई पोलिसांचे आभार मानले.

नक्की काय घडलं होतं?

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ३१ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन मुलींचे फोटो शेअर केले होते. तिने एफआयआरचा फोटो देखील पोस्ट केला होता आणि लिहिलं होतं की, "आमची हेल्पर कांता हिची मुलगी सलोनी आणि तिची मैत्रीण नेहा ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्या शेवटच्या वाकोला परिसरात दिसल्या होत्या. मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही."

मुख्यमंत्र्यांकडेही मागितलेली मदत

या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करताना अंकिता म्हणाली होती की, त्या मुली आमच्या घरातल्यासारख्या आहेत. त्या आमच्या कुटुंबीय आहेत. आम्ही खूप दुःखी आहोत आणि विशेषतः मुंबई पोलीस, मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी ही बातमी सर्वत्र पसरवावी आणि मुली सुरक्षित परत येण्यासाठी कोणत्याही प्रकारे मदत करावी.

दोन्ही मुली सुखरूप परतल्या

अंकिता लोखंडेने देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह मुंबई पोलिसांनाही टॅग करत मदत मागितली होती. आज अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, सलोनी आणि नेहा दोघी सुखरूप सापडल्या. आम्ही आनंदी आहोत. मुंबई पोलिसांचे आम्ही आभार मानतो.

Web Title: Thanks to Mumbai Police as two missing girls found safe Information given by Actress Ankita Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.