​झी युवावर प्रेक्षकांना मनोरंजनाची वर्षाखेर भेट 'झी युवा सन्मान’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 14:41 IST2017-12-29T08:47:11+5:302017-12-29T14:41:03+5:30

फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत ...

Zee Youthful Achievement on the Year of Entertainment by Zee Yuva! | ​झी युवावर प्रेक्षकांना मनोरंजनाची वर्षाखेर भेट 'झी युवा सन्मान’!!

​झी युवावर प्रेक्षकांना मनोरंजनाची वर्षाखेर भेट 'झी युवा सन्मान’!!

्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशाकृतीशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवा तर्फे युवा सन्मान पुरस्काराचा तुरा रोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना 'झी युवा सन्मान' पुरस्कार जाहीर झालेआहेत. झी युवा म्हणजे समाजात जे चांगले आहे ते समोर आणणे आणि त्याचे कौतुक करणे हे समीकरण या पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा दृढ झाले आहे.

पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील अकरा युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिकच्या बुद्धीबळपटू विदीत गुजराती याला ‘झी युवा क्रीडा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकावरील छेडछाड करणाऱ्या पोलिसांच्या मदतीने पकडून दीडशे लैंगिक अत्याचार रोखणार्या मुंबईच्या दीपेश टंक याला ‘दक्ष नागरिक सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरुण वाचकघडवणारा युवा लेखक सुदीप नगरकर ‘साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. प्रभावी प्रवासी अँप बनवून गरज व तंत्रज्ञान यांची नाळ जोडणारा मुंबईच्या सचिन टेके याला ‘उद्योजक सन्मान’पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. वयाच्या पंचविशीत सर्वाधिक पेटंट घेणाऱ्या यवतमाळच्या अजिंक्य कोत्तावार याची निवड ‘विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान’ पुरस्कारसाठी झाली आहे.  छोटे छोटे शो करतएक दिवस स्वतःचेच रेडिओ चँनेल सुरू करणारा जिद्दी कराडचा सतीश नवाळे ‘निर्धार सन्मान’ पुरस्कारने सन्मानित होणार आहे. धावपटू गोल्डनगर्ल अशी ओळख कमावलेली सातारची ललिता बाबर‘यशस्वीता सन्मान’ ची मानकरी ठरली आहे. अनेक लघुपट सिनेमा नाटक व मालिका यामध्ये विविध पठडीच्या भूमिका करणारा अमेय वाघ याला ‘कला सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे.  लोकगीताचाबाज जपत संगीत प्रयोगशील करणारा गायक आदर्श शिंदे आणि नव्या युगाचा सूर सापडलेली प्रियांका बर्वे या दोघांना ‘संगीत सन्मान’ चा किताब प्रदान करण्यात येणार आहे. लहानपणीच निराधारझाल्यामुळे बालसंकुलात वाढलेला, स्वबळावर इंजिनियर होऊन चांगल्या कंपनीतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून सामाजिक संस्था सुरू करणाऱ्या सागर रेड्डी याचा ‘सामाजिक जाणीव’ पुरस्कारदेण्यात येणार आहे.
 
 

Web Title: Zee Youthful Achievement on the Year of Entertainment by Zee Yuva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.