कॅरी मिनाटीला आत्ता कुठे आठवला ‘बिग बॉस’! शेअर केला नवा रोस्ट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:38 PM2021-05-24T15:38:03+5:302021-05-24T15:51:01+5:30

Carry Minati Roast Video : सुमारे 4 महिन्यानंतर कॅरी मिनाटीने एक नवा रोस्ट व्हिडीओ अपलोड केला आहे. 21 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

YouTuber Carry Minati Trolls Bigg Boss Contestants brutally roasts rubina dilaik rahul vaidya jaan kumar sanu | कॅरी मिनाटीला आत्ता कुठे आठवला ‘बिग बॉस’! शेअर केला नवा रोस्ट व्हिडीओ

कॅरी मिनाटीला आत्ता कुठे आठवला ‘बिग बॉस’! शेअर केला नवा रोस्ट व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्दे‘द लँड ऑफ बिग बॉस’ नावाने अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत बिग बॉस 14 च्या घरातील वाद आणि अनेक मजेदार सीन्स आहेत. 

सोमवार सकाळपासून ट्विटरवर  #CarryMinati हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. यावरच्या मीम्सचाही पूर आला. कारण काय तर युट्यूबर कॅरी मिनाटी अर्थात अजय नागरने शेअर केलेला नवा रोस्ट व्हिडीओ.
सुमारे 4 महिन्यानंतर कॅरी मिनाटीने एक नवा रोस्ट व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत कॅरीने त्याच्या अंदाजात अनेकांची खिल्ली उडवली आहे. पण सर्वाधिक रोस्ट झाली आहे ती बिग बॉस 14 ची (Bigg Boss 14) स्पर्धक रूबीना दिलैक (Rubina Dilaik). याशिवाय जान कुमार सानू याचीही त्याने जबरदस्त खिल्ली उडवली. 21 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

‘द लँड ऑफ बिग बॉस’ नावाने अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत बिग बॉस 14 च्या घरातील वाद आणि अनेक मजेदार सीन्स आहेत. राखी सावंत, एजाज खान, जान कुमार सानू व रूबीना यात दिसतेय. सलमान खान ‘बिग बॉस 14’ची विनर म्हणून रूबीनाचे नाव जाहिर करतो, त्यावेळी तिच्या चेह-यावरच्या एक्स्पे्रशनची एक क्लिप या व्हिडीओत आहे. यावर मुबारक, आता कक्कड फॅमिलीकडून फोन येईल, असे कॅरी म्हणताना दिसतोय. ‘बिग बॉस 14’ जिंकल्यानंतर रूबीनाचा नेहा कक्करसोबत एक म्युझिक व्हिडीओ आला होता. या पार्श्वभूमीवर कॅरीने रूबीना रोस्ट केले आहे.

व्हिडीओत कॅरी मिनाटीने राहुल वैद्यलाही रोस्ट केले आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडीओत कॅरीने शिव्या आणि असभ्य शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे बातमीसोबत त्याचा हा रोस्ट व्हिडीओ आम्ही जोडलेला नाही.

कोण आहे कॅरी मिनाटी?

नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत.
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.

अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.

Web Title: YouTuber Carry Minati Trolls Bigg Boss Contestants brutally roasts rubina dilaik rahul vaidya jaan kumar sanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.