'ती परत आलीये' मालिकेतील कुंजिका काळविंट विंषयी या गोष्टी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:52 PM2021-08-16T12:52:11+5:302021-08-16T12:57:05+5:30

कुंजिका काळविंट झी मराठीवरील आगामी मालिका 'ती परत आलीये' या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

You Will be surprised to know About Actress Kunjika Kalvint In The Lead Role In Ti Parat Aliye | 'ती परत आलीये' मालिकेतील कुंजिका काळविंट विंषयी या गोष्टी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

'ती परत आलीये' मालिकेतील कुंजिका काळविंट विंषयी या गोष्टी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

googlenewsNext

'ती परत आलीये' या मालिकेचे प्रोमोज रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल चर्चा रंगली आहे. इतकंच काय तर या मालिकेच्या प्रत्येक प्रोमोसोबत प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम याना प्रेक्षकांनी पाहिलं पण इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. आता  कुंजिका काळविंट झी मराठीवरील आगामी मालिका ती परत आलीये या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

मालिकेत कुंजिका सोबत अजून अनेक कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विजय कदम यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्या सोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कुंजिकाने आनंद व्यक्त केला तसंच थ्रिलर जॉनर हा आवडीचा असून त्या जॉनरच्या मालिकेत काम करताना खूप मजा येतेय अशा भावना कुंजिकाने व्यक्त केल्या. "यापूर्वी मालिकेत मी खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत होतं.

कुंजिकाने 'स्वामीनी', 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेतही झळकली आहे. स्वामीनी’ या लोकप्रिय मालिकेत तिने आनंदीबाईची भूमिका साकारली होती.  ‘चंद्र आहे साक्षीला’ या मधून तिने प्रियाची भूमिका साकारली होती. ही भूमिका रसिकांनाही विशेष पसंतीस पात्र ठरली होती.मालिकाच नाही तर कुंजिंकाने सिनेमातही काम केले आहे. ‘एक निर्णय’ या सिनेमातून कुंजीकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 

एक ​कलाकार म्हणून मला नव्या भूमिकांचं अवकाश शोधायचं होतं. जिथं मला नवं काही शिकायला मिळेल. ही संधी ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मिळाली. मला स्वतःला थ्रिलर हा प्रकार अधिक आवडतो. त्यामुळे अशा मालिकेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. ही भूमिका आव्हानात्मकदेखील आहे.

 

 

'ती परत आलीये' म्हणजे ती नक्की कोण, हे गूढ उलगडताना पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसंच या मालिकेमुळे मला ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे." असं कुंजिका सांगते.

Web Title: You Will be surprised to know About Actress Kunjika Kalvint In The Lead Role In Ti Parat Aliye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.