एक दीवाना था फेम डॉनल बिष्टच्या लेहंगाचे वजन ऐकून तुम्हालाही देखील बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 12:05 IST2017-12-14T06:35:42+5:302017-12-14T12:05:42+5:30
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...
.jpg)
एक दीवाना था फेम डॉनल बिष्टच्या लेहंगाचे वजन ऐकून तुम्हालाही देखील बसेल आश्चर्याचा धक्का
ए दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दीवाना था या मालिकेला सध्या अनेक वळणं मिळत असून या मालिकेतील रहस्यमय थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. येत्या भागात सौंदर्यवती शरण्या म्हणजेच डॉनल बिष्ट एका सुंदर वधूच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शरण्याच्या वधूच्या लुकसाठी क्रिएटिव्ह टीम आणि डिझाइनर्स यांनी अनेक दिवस एकत्र काम केले आहे. त्यांनी तिला या खास भागासाठी उत्कृष्ट आभूषणे आणि खास लेहंगा बनवून दिला आहे. यातून तिला अद्ययावत लुक देण्याचा प्रयत्न मालिकेच्या टीमने केला आहे. याविषयी डॉनलशी संपर्क साधला असता तिने सांगितले, “मी माझ्या आयुष्यात नखशिखांत कधीच नटले नव्हते. माझा लहंगा खास क्रिएटिव्ह टीम आणि डिझाइनर्सकडून तयार करण्यात आला आहे. त्यावर सोनेरी भरतकाम करण्यात आलेले आहे. त्याचे वजन जवळ जवळ ४० किलो इतके आहे. इतका जड पोशाख मी यापूर्वी कधीच परिधान केलेला नव्हता. या दृश्यासाठी क्रिएटिव्ह टीमने दिलेले सुबक दागिने मला खूप आवडले आहेत. मांग टीका, झुमके, बांगड्या आणि सुंदर नेकलेस अशी खूप छान ज्वेलरी मी या दृश्यांसाठी घातली आहे. वधू सारखा गेटअप करण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी मला जवळ जवळ दोन तास लागले आणि मी या वेशात इतकी सुंदर दिसत होती की, क्षणभर मी हे विसरूनच गेले होते की, मी केवळ एका दृश्याच्या चित्रीकरणासाठी वधूप्रमाणे नटले आहे.”
एक दिवाना था या मालिकेच्या पुढील भागांमध्ये अनेक अडथळे पार करून शरण्या आणि व्योम लग्नासाठी सज्ज झाले आहेत. ही एका सुंदर प्रवासाची सुरुवात असेल की या मंगल प्रसंगी काही विघ्नं घडणार हे प्रेक्षकांना या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. विक्रम सिंह चौहान या मालिकेत व्योम ही भूमिका साकारत आहे.