"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:40 IST2025-09-06T12:40:08+5:302025-09-06T12:40:43+5:30
एका मुलाखतीत ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe)ने सिनेइंडस्ट्रीत सुरूवातीला तिला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितले.

"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर ती परखड मत मांडताना दिसते. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने सिनेइंडस्ट्रीत सुरूवातीला तिला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितले.
ऋतुजा बागवेने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली, त्यावेळी तिला हिरोईन मटेरियल तू नाही म्हणून रिजेक्शन झालं, असा क्षण कधी आला, असे विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली की, ''जेव्हा मी आधी ना मालिकांचे खूप ऑडिशन्स देत होते. फायनल टू रिजेक्शन, फायनल टू रिजेक्शन... का होतेय रिजेक्शन? काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरोईन नाहीये. मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेतून ३ महिन्यांनी मला अचानक रिप्लेस करुन टाकलं तर मी म्हटलं असं अचानक का रिप्लेस केलं? ऑडिशन वगैरे घेऊनच तुम्ही मला कास्ट केलं होतं. ते हिरोईन मटेरियल तू नाही वाटत आहेस, म्हणून चॅनेलचं असं म्हणणं आहे की तू तुला रिप्लेस करावं वगैरे वगैरे.''
''आणि मग नशिबाने ती भूमिका मिळाली... ''
ती पुढे म्हणाली की, ''बापरे असंही असतं. आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकतंय आपल्याला साइडला आपण आपलं नाटकच करावं. माझं नाटक कधी मला विचारत नाही तू कशी दिसतेस वगैरे.. आई म्हणाली, नाही नाही तुला जायचंय हे ते वगैरे नायिका होणार तू मला माहितीये वगैरे आणि मग असा एक काळ आला जेव्हा तशा नाही आपल्या जवळच्या वाटणाऱ्या, घरगुती वाटणाऱ्या तशा हिरोईन्स किंवा नायिका हव्या होत्या आणि मग नशिबाने ती भूमिका मिळाली.तेव्हाही मला ट्रोल केलं गेलं दिसण्यावरुन पण ती भूमिका माझं त्यातलं काम ते २-३ महिन्यांनी आवडू लागलं. त्यामुळे मग लोकांनी मला स्वीकारलं. मुक्ता बर्वेचे काही इंटरव्ह्यूज पाहिलेत.ती पण याला चुकली नाहिये तर आपण कोण आहे. आपण आता शिकतोय तर म्हटलं करत राहूया. मला वाईट वाटतं पण मी ना हरत नाही. मी करत राहते. करत राहते. पण जे मी तुला म्हटलं ना या मालिकेनंतर हिंदी मालिकेनंतर मला आता फरकच नाही पडत आता प्रुव्ह केलेलं आहे मी. तुम्हाला आवडत असेल मला कास्ट करा. नसेल आवडत तर ओके टाटा बाय..''