ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री, एका प्रसिद्ध मालिकेत साकारतेय खलनायिकेची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 15:20 IST2021-03-22T15:14:41+5:302021-03-22T15:20:25+5:30

या अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla fame Aditi Sarangdhar shares her older picture on social media | ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री, एका प्रसिद्ध मालिकेत साकारतेय खलनायिकेची भूमिका

ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री, एका प्रसिद्ध मालिकेत साकारतेय खलनायिकेची भूमिका

ठळक मुद्देयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविकाच्या भूमिकेत आदिती सारंगधरला पाहायला मिळत आहे. आदितेने या साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका नुकतीच सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वीटू ही गरीब आहे तर ओम हा अतिशय श्रीमंत आहे. ओम नेहमीच स्वीटूच्या प्रत्येक समस्येत तिच्या पाठिशी उभा राहातो. पण स्वीटू आणि ओमची ही मैत्री ओमच्या बहिणीला म्हणजेच मालविकाला अजिबातच आवडत नाही. 

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविकाच्या भूमिकेत आदिती सारंगधरला पाहायला मिळत आहे. आदितेने या साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.

आदिती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. आदिती या फोटोत खूपच वेगळी दिसतेय असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. रुईया कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून अदितीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर तिने पाऊल ठेवलं.याशिवाय छोट्या पडद्यावरील 'दामिनी', 'वादळवाट', 'लक्ष्य' अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली. 'नाथा पुरे आता' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. 'प्रपोजल' हे नाटक अदितीच्या कारकिर्दीतील मैलाचं दगड ठरलं. या नाटकातील भूमिकेसाठी विविध पुरस्कारानं अदितीचा गौरवही करण्यात आला.

Web Title: Yeu Kashi Tashi Me Nandayla fame Aditi Sarangdhar shares her older picture on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.