'ये उन दिनों की बात है' करणार रसिकांना अलविदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:01 AM2019-07-15T11:01:05+5:302019-07-15T11:02:14+5:30

नव्वदीचे दशक रसिकांना समाजावे म्हणून 'कयामत से कयामत' सारखा सिनेमा आणि चांदनीमधील काही गाणीही रसिकांना मालिकेत पाहायला मिळाली.

Yeh Un Dinon Ki Baat Hai Tv Series Off Aire Very Soon | 'ये उन दिनों की बात है' करणार रसिकांना अलविदा!

'ये उन दिनों की बात है' करणार रसिकांना अलविदा!

googlenewsNext

छोट्या पडद्यावर 'ये उन दिनों की बात है'  ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. 90 चा काळ या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेने रसिकांची पसंती मिळवली होती. या मालिकेतील अशी सिंग आणि रणदीप राय यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. नव्वदीचे दशक रसिकांना समाजावे म्हणून 'कयामत से कयामत' सारखा सिनेमा आणि चांदनीमधील काही गाणीही रसिकांना मालिकेत पाहायला मिळाली.


मात्र  नेहमीच्या  सास-बहू टाईप मालिकाच सर्वात जास्त काळ या शर्यतीत टीकू शकतात. त्यामुळे कुठे ना कुठे थांबायचे होते. .या मालिकेची स्टोरी ही आणखी जास्त चालू शकत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्टला ही मालिका निरोप घेणार आहे. 
विशेष म्हणजे या मालिकेची कथा काल्पनिक नसून  सत्यकथेवर आधारित होती.  प्रोड्यूसर साक्षी आणि सुमित मित्तल यांच्या रिअल लाईफवर ही कथा आधारित होती.शशी आणि सुमीत मित्तल यांच्या जोडीने आजवर अनेक हिट मालिका दिल्या आहेत. मालिका पाहाणारे प्रेक्षक हे अधिकाधिक छोट्या गावातील असतात. त्यांना कुटुंबातील कथा पाहायला आवडतात. त्यामुळेच एक साधी प्रेमकथा या मालिकेत दाखवण्याचा विचाराने . 'ये उन दिनों की बात है'  मालिका सुरू करण्यात आली होती.

शशी आणि सुमीत मित्तल यांच्या जोडीने या मालिकेपूर्वी 'पहरेदार पिया की' या मालिकेची निर्मिती केली होती. ही मालिका चांगलीच वादग्रस्त ठरली होती. या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी पाहायला मिळाली होती. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या पचनी पडली नव्हती. या मालिकेची लोकांनी ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट काऊन्सिलकडे तक्रार केली होती त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आली. 

Web Title: Yeh Un Dinon Ki Baat Hai Tv Series Off Aire Very Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.