Yeh Rishta Kya Kehlata Hai मालिकेतील कार्तिकचा 'झिंगाट' डान्स सोशल मीडिया ठरतोय हिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 16:14 IST2018-09-29T16:11:13+5:302018-09-29T16:14:27+5:30
मोहसीन सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्याचे असे भन्नाट व्हीडीओ, स्टायलिश फोटोशूट तो त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो.

Yeh Rishta Kya Kehlata Hai मालिकेतील कार्तिकचा 'झिंगाट' डान्स सोशल मीडिया ठरतोय हिट!
'सैराट' सिनेमातील रसिकांना याड लावणारं ‘याड लागलं’ हे गाणं आणि रसिकांसह मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनाही झिंग झिंग झिंगाट ताल धरायला भाग पाडले. अगदी मराठी व्हर्जनप्रमाणे झिंगाटच्या हिंदी व्हर्जनचेही सेलिब्रेटींना याड लागल्याचे पाहायला मिळतंय. आपला डान्सिंग अंदाज रसिकांना दाखवायचा असेल तर झिंगाट या गाण्यावर थिरकलच पाहिजे हे समीकरण आता पक्क झालंय.
नुकतेच 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कार्तिकचा एक डान्सिंग व्हिडीओ समोर आला आहे.यांत तो झिंगाट गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे नुकताच कार्तिक म्हणजे मोहसिन खानचा वाढदिवस होता. वाढदिवस त्याने त्याच्या कुटुंबियाबरोबर सेलिब्रेट केला. यावेळी त्याचे कुटुंबियही मोहसीन बरोबर 'झिंगाट' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
मोहसीन सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्याचे असे भन्नाट व्हीडीओ, स्टायलिश फोटोशूट तो त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. सशल मीडियावर मोहसीनचे जवळपास 10 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. या जोडप्यांमध्ये आणखी एका जोडीची भर पडणार आहे. ऑनस्क्रीन एकमेकांच्या अथांग प्रेमात बुडलेले नायरा म्हणजेच शिवांगी जोशी आणि कार्तिक म्हणजेच मोहसिन खान खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या दोघांच्या अफेअरच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. पण त्यांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे.
तर दुसरीकडे मोहसिन त्यांच्या नात्याबाबत उघडपणेही बोलताना दिसतो.दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, "आमच्या दोघांची सुरुवातीपासून खूप चांगली मैत्री आहे. आमच्या दोघांच्या नात्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत आणि त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम होऊ नये म्हणून मी काहीही बोलणे आजवर टाळले होते. खरे तर सुरुवातीच्या काळात आमच्यात केवळ मैत्री होती. त्यामुळे मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत काहीही बोलण्यात तथ्य नव्हते. पण गेल्या काही महिन्यात आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे.