पूजा पडली संदीपच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 12:31 IST2016-08-22T07:01:44+5:302016-08-22T12:31:44+5:30

नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जीचा 12 ऑक्टोबरला साखरपुडा होणार आहे. आशियाई खेळात ...

Worshiping Sandeep's love | पूजा पडली संदीपच्या प्रेमात

पूजा पडली संदीपच्या प्रेमात

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जीचा 12 ऑक्टोबरला साखरपुडा होणार आहे. आशियाई खेळात स्विमिंग या खेळात मेडल मिळवणाऱ्या संदीप सेजवालसोबत ती साखरपुडा करणार आहे. पूजा आणि संदीप दहा वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. पूजा एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली स्विमरदेखील आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धादेखील जिंकल्या आहेत. जयपुरला एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्या दोघांची ओळख झाली होती. पूजा सांगते, "संदीपने मला कित्येक वर्षांपूर्वीच लग्नासाठी मागणी घातली होती. करियरमध्ये स्थिरस्तावर झाल्यानंतर आता आमच्या दोघांच्या पालकांच्या समंतीने आम्ही साखरपुडा करत आहोत. लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण पुढच्या वर्षी लग्न करण्याचा आमचा विचार आहे."

Web Title: Worshiping Sandeep's love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.