मांजा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:07 IST2018-04-12T07:37:30+5:302018-04-12T13:07:30+5:30

मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने ...

World Television Premiere of Manza Film | मांजा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

मांजा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

ाठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळत आला आहे.

येत्या रविवारी झी टॉकीजवर 'मांजा' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. अश्विनी भावे यांचा दमदार अभिनय असलेल्या मांजा या चित्रपटात सुमेध मुद्गलकर आणि बालक पालक फेम रोहित फाळके यांनी देखीलत्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना अचंबित केले. थ्रिलर शैलीचा मांजाचे कथानक नव्याने जीवन सुरू करणाऱ्या आई व मुलाभोवती फिरते. तीनही पात्रांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाआहे. एक मानसिक थरारपट असलेला मांजा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला कारण प्रेक्षक या चित्रपटाशी रिलेट करू शकले. मांजाचा युएसपी हा आहे की त्यातील पात्रे त्यांच्या मूळ प्रवृत्तींशी सुसंगत वागतात आणि त्यामुळे हीकथा जास्त सशक्त झाली आहे.

बालक पालक फेम रोहित फाळके आणि डान्स इंडिया डान्स फेम सुमेध मुद्रलकर या चित्रपटात झळकले आहेत. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे. पालक मुलांचे नातं दृढ करणारी आणि या नात्याला नवे वळण देणारी ही गोष्ट आहे. या सिनेमाविषयी सांगतना अश्विनी भावे म्हणाल्या होत्या की, "माझा मुलगा हा अतिशय अबोल आहे. त्याला कोणामध्ये मिसळायला आवडत नाही. मी एकटी त्या मुलाचा सांभाळ करते आहे, त्याला वाढवते आहे. तसेच आपल्या मुलाच्या मानसिक सक्षमीकरणासाठी  झटत आहे." 

Web Title: World Television Premiere of Manza Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.