मोनालिसाने विक्रांतसह केले ग्लॅमरस Photoshoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 13:03 IST2017-06-16T07:30:34+5:302017-06-16T13:03:50+5:30
बिग बॉस शोमधून चर्चेत आलेली मोनालिसा आता बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतेय. मात्र फोटोशूट करण्यापलिकडे मोनालिसाच्या हाती चांगले काम हाती लागले नसल्याचे कळतंय.

मोनालिसाने विक्रांतसह केले ग्लॅमरस Photoshoot
भ जपुरी सिनेमाची अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेली मोनालिसा सध्या खूप खुश आहे.कारण मोठ्या मेहनतीने तिने चक्क 10 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी होताच मोनालिसाने पती विक्रांत सिंह राजपूतसह फोटोशूट केले आहे. फोटोशूटमध्ये मोनालिसा आधीपेक्षा अधिक गॉर्जियस दिसत असून मोनालिसा आणि विक्रांत दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.त्यांच्या या फोटोंना नेटीझन्सकडून अधिक पसंतीही मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.बिग बॉस सिझन 10 या रिअॅलिटी शोची स्पर्धक आणि भोजपूरी सिनेमा अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मोनालिसाला खरी ओळख बिग बॉस या शोने मिळवून दिली. या शोमुळेच फक्त भोजपूरी सिनेमापर्यंतच स्थिमित असणारी मोनालिसाला बिग बॉस याच शोने ख-या अर्थाने प्रसिध्दी मिळवून दिली. याच शोमध्ये तिचे बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूतसह ऑनस्क्रीन लग्नही लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.बिग बॉसनंतर नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोमध्येही पती विक्रांतसह मोनालिसा झळकली.' नच बलियेशो नंतर दोघांकडेही वेळ असल्यामुळे त्यांनी त्यांचे हनीमून प्लॅन केले होते.खुद्द मोनालिसानेच तिचे हनीमून एन्जॉय करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते.त्या फोटोंमध्ये मोनालिस खूपच बोल्ड दिसत असून,बिचवर ती पती विक्रांतसह मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. बिग बॉस शोमधून चर्चेत आलेली मोनालिसा आता बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतेय. मात्र फोटोशूट करण्यापलिकडे मोनालिसाच्या हाती चांगले काम हाती लागले नसल्याचे कळतंय.मोठा पडदा तर सोडाच मात्र छोट्या पडद्यावरील ऑफर्सही मोनालिसाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे तिचे हे फोटोशूट नवीन काम मिळवण्यासाठीचा खटाटोप तर नाही ना असा प्रश्न पडला नाहीतरच नवल.