ओंकार इंगवले अंतिम फेरीतील विजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:51 IST2016-12-09T17:51:20+5:302016-12-09T17:51:20+5:30
सध्या हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये रियालिटी शोची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीकडे विविध रियालिटी शो पाहायला मिळतात. ...

ओंकार इंगवले अंतिम फेरीतील विजेता
स ्या हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये रियालिटी शोची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीकडे विविध रियालिटी शो पाहायला मिळतात. तरूणांच्या कलागुणांना वाव मिळाव म्हणून रियालिटी शो हा सर्वाेत्तम मानला जातो. त्यामुळे सध्या कोणत्याही रियालिटी शोकडे मोठया प्रमाणात तरूणांई वळताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. असाच एक रियालीटी शो दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या रियालिटी शोचे नाव ढोलक झाली बोलकी असे आहे. या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा ८ डिसेंबर रोजी पार पडला यामध्ये ओंकार चंद्रकांत इंगवले हा अंतिम विजेता ठरला असून ढोलकी सम्राट या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण ४८ जण सहभागी झाले होते. अंतिम फेरीसाठी ४ जणांची निवड करण्यात आली होती .अंतिम फेरी पार करत पुण्याचा ओंकार चंद्रकांत इंगवले यांनी 'ढोलकी सम्राट 'हा पुरस्कार मिळविला. या कार्यक्रमाची संकल्पना अनिल करंजावकर यांची होती. तालसम्राट पं मुंकूंद पाटील यांचे शिष्य ओंकार इंगवले यांनी अरे वा शाब्बास (मी मराठी) ,मराठी पाऊल पडते पुढे अशा विविध कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करून विजितेपद मिळविले आहे. कुटूंबातून चालत आलेला हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून (चंद्रकांत इंगवले) याच्यांकडून मिळालेला आहे .22 तालवाद्य वाजविण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे . सद्गगुरू माता सरविंदर हरदेव जी महाराज यांच्या आशीवार्दाने त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा या पुरस्काराने ओंकारच्या स्वप्नांनादेखील चार चाँद लागले आहेत.